दसरा मेळाव्यानिमित्त शिवसेना आणि उद्धव ठाकरे गट यांचे शक्तीप्रदर्शन !

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांनी २४ ऑक्टोबर या दिवशी सार्वजनिक सभेद्वारे शक्तीप्रदर्शन केले.

मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे तुकडे होतील ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना  

मुंबई येथील ‘दसरा मेळाव्या’त उद्धव ठाकरे यांची गर्जना !

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना ललित पाटील याची चौकशी का केली नाही ? – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याला १० नोव्हेंबर २०२० या दिवशी अटक करण्यात आली होती. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी ललित पाटील याला नाशिकचे जिल्हाप्रमुख केले होते.

गांधीनगर महावितरण कार्यालयासमोर उद्धव ठाकरे गटाची निदर्शने !

दसरा आणि दीपावली यांमुळे वस्तूंची विक्री आणि देवाणघेवाण वाढली आहे. याचसमवेत उन्हाची तीव्रता वाढल्याने विजेची मागणीही वाढली आहे. असे असतांना महावितरणकडून दुरुस्तीच्या नावाखाली सतत भारनियमन होत आहे.

…तर सुनावणीचे वेळापत्रक आम्ही ठरवून देऊ !-सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

विधानसभा अध्यक्षांकडून योग्य प्रकारे सुनावणी घेतली जायला हवी. नियमित सुनावणी घेऊन याविषयीचा निर्णय पूर्ण करायला हवा. ‘नोव्हेंबरनंतर सुनावणी घेऊ’, असे अध्यक्ष म्हणू शकत नाहीत.

शिवसेनेच्‍या आमदार पात्रतेविषयी २० ऑक्‍टोबर या दिवशी सुनावणी होणार !

शिवसेनेचे १६ आमदार पात्र कि अपात्र ? याविषयी १२ ऑक्‍टोबर या दिवशी विधानसभेचे अध्‍यक्ष राहुल नार्वेकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली सुनावणी झाली; मात्र या वेळी कोणतीही ठोस भूमिका निश्‍चित करण्‍यात आली नाही.

सिंधुदुर्ग : वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील व्यवस्था न सुधारल्यास आंदोलनाची चेतावणी

यावरून प्रशासनाला केवळ आंदोलनाचीच भाषा समजते, असे समजायचे का ? दुर्गम भागातील शासकीय रुग्णालयांकडे प्रशासनाचे प्राधान्याने लक्ष देणे आवश्यक !

रुग्‍णालयातील मृत्‍यूंच्‍या प्रकरणाची ‘सीबीआय’ चौकशी व्‍हावी ! – उद्धव ठाकरे, माजी मुख्‍यमंत्री

राज्‍यातील रुग्‍णालयांमध्‍ये सर्वसामान्‍यांसाठी औषधे मिळत नाहीत. औषध खरेदीसाठी सरकारने दलाल नेमले आहेत का ? औषधांसाठी निविदा काढणे बंद का करण्‍यात आले आहे ? आरोग्‍ययंत्रणेला पोखरणारे खेकडे सरकारमध्‍येच आहेत.

सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांतील प्रस्तावित खनिज प्रकल्प वाचवण्यासाठी उप वनसंरक्षकांचे खोटे प्रतिज्ञापत्र !

वनसंरक्षक हेच आता वनभक्षक बनले आहेत, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि माजी नगरसेवक डॉ. जयेंद्र परूळेकर अन् असनिये गावचे माजी सरपंच संदीप सावंत यांनी केला आहे.

आमदारांच्‍या पात्रतेविषयीच्‍या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्‍याची काँग्रेसची मागणी !

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या शिवसेनेच्‍या दोन्‍ही गटांकडून सर्वोच्‍च न्‍यायालयात परस्‍परविरोधी याचिका करण्‍यात आल्‍या आहेत.