|
मुंबई – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबई आणि ठाणे येथे संथ गतीने मतदान होत असल्याचा आरोप केला होता. २० मे या दिवशी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावरही आरोप केले होते. याची नोंद घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकार्यांकडून वस्तूनिष्ठ अहवाल मागवला आहे. यामध्ये ‘ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर केलेले आरोप निराधार असल्याचे स्पष्ट झाल्यास ठाकरे यांच्यावर कारवाई केली जाईल’, अशी माहिती आयोगातील सूत्रांनी दिली.