ठाणे येथे मनसैनिकांकडून उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर आक्रमण !

उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर आक्रमण

ठाणे :  १० ऑगस्टच्या रात्री साडेआठच्या सुमारास मेळावा घेण्यासाठी आलेले येथील गडकरी रंगायतनमध्ये उद्धव ठाकरे यांच्या वाहनांच्या ताफ्यावर मनसैनिक यांनी शेण, बांगड्या आणि टॅमॅटो फेकले. मनसैनिकांनी त्यांचा फलक फाडला. रस्त्यावर बांगड्यांचा खच पडला होता. ‘क्रियेची प्रतिक्रिया होते’, अशी प्रतिक्रिया या संदर्भात मनसेचे संदीप देशपांडे यांनी दिली.

येथे पोलिसांची कुमक मोठ्या प्रमाणात बोलावण्यात आली. रस्ता पोलिसांनी रिकामा करून बंद केला. मोठ्या प्रमाणात मनसे महिला कार्यकर्त्या होत्या. १०० ते १५० कार्यकर्ते होते.