Vikrant Sahare : ठाकरे गटाच्या युवासेनेच्या चंद्रपूर जिल्हाप्रमुखांच्या घरातून ४० जिवंत काडतुसे, तलवार आणि वाघनखे जप्त !

[WPI_DISPLAY_SHARE_ICONS]
विक्रांत सहारे(उजवीकडे )

चंद्रपूर – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे चंद्रपूर जिल्ह्याचे प्रमुख विक्रांत सहारे यांच्या येथील निवासस्थानी रामनगर पोलिसांनी धाड घातली. त्यांच्या घरातून ४० जिवंत काडतुसे, तलवार आणि वाघनखे जप्त करण्यात आली. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.

याआधी घडलेल्या गुन्ह्यांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बंदूक, देशी कट्टा, तलवार वापरणार्‍यांविरुद्ध कारवाई चालू केली आहे. याच कारवाईतून आतापर्यंत २२ गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे.

[WPI_DISPLAY_SHARE_ICONS][RELATED_ARTICLES]