शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडून ‘ढाल-तलवार’ हे चिन्ह !

अंधेरीची पोटनिवडणुकीत ‘मशाल’ आणि ‘ढाल-तलवार’ यामध्ये चुरशीची लढत होणार आहे.

शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवले !

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र ‘शेअर’ करत ‘जिंकून दाखवणारच !’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप !

प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला, तर दुसरीकडे बीकेसी मैदानात (वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला.

भाजपची साथ सोडली म्हणून हिंदुत्व सोडलेले नाही ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

शिवसेना आणि भाजप या पक्षांना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद घ्यायचे ठरले होते, हे मी शपथ घेऊन सांगतो. भाजपने पाठीत वार केला. त्यांना धडा शिकवण्यासाठी मी महाविकास आघाडी केली होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते, ते आमच्याकडे आहे. या देशात जे काही निर्णय होतात ते घटना, नियम यांच्या आधारेच होत असतात.

मुंबई महानगरपालिकेने शिवसेनेच्या दोन्ही गटांना शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची अनुमती नाकारली !

कोणत्याही एका अर्जदारास अनुमती दिल्यास या संवेदनशील परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था यांचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे अनुमती नाकारण्यात आली.

मुंबईवर हक्क सांगण्याच्या भानगडीत पडू नका ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

मुंबईकरांनी २५ वर्षे विश्वास दाखवला. कसाबचे आक्रमण असा वा नैसर्गिक आपत्ती असो शिवसैनिकांनीच साहाय्य केले आहे; परंतु ज्यांना शिवसेनेने मोठे केले, ज्या सेनेने पदे दिली, त्यांनीच दगा केला, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले.

‘आरे’साठी काँग्रेसकडून आंदोलन !

आरे जंगलात मेट्रो कारशेडला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पर्यावरणप्रेमी नागरिक यांच्याकडून विरोध होत असतांना काँग्रेसच्या पर्यावरण विभागाने २१ ऑगस्ट या दिवशी ठाणे येथे ‘आरे वाचवा’ आंदोलन केले.

संभाजीनगर येथे ‘ईडी’विरुद्ध उद्धव ठाकरे गटाने लावलेले फलक काढले !

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाचे जय विश्वभारती कॉलनी शाखाप्रमुख रोहन आचलिया यांनी रोपळेकर, विवेकानंद चौक येथे ‘ईडी’ कारवाईविषयी फलक लावले.

सर्वोच्च न्यायालयात दोन्ही पक्षांतील अधिवक्त्यांकडून विविध सूत्रांवर युक्तीवाद !

धनुष्यबाण चिन्ह हवे; मात्र उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मान्य नसल्याची शिंदे गटाची सर्वाेच्च न्यायालयात प्रथमच मान्यता !