उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने निवेदन सादर

गांधीनगर (जिल्हा कोल्हापूर), १० मार्च (वार्ता.) – मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांनी गांधीनगरमध्ये अनेक जणांना घायाळ केले आहे. मोकाट कुत्री, गाढवे यांच्याविषयी गांधीनगर ग्रामपंचायतला वारंवार तक्रार देऊनही कार्यवाही न झाल्याने मागील २ दिवसांत पिसाळलेल्या कुत्र्यांनी २५ जणांचा चावा घेतला आहे. त्यामुळे गांधीनगर ग्रामपंचायतवर त्वरित कारवाई करावी आणि मोकाट कुत्री, गाढवे यांचा बंदोबस्त करावा, तसेच गांधीनगर येथे कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकार्यांची नियुक्ती करावी, या मागण्यांचे निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने पंचायत समिती करवीरचे प्रशासक तथा गट विकास अधिकारी विजय वसंत यादव यांना देण्यात आले.

येत्या ८ दिवसात संबंधित ग्रामपंचायतीने मोकाट कुत्री आणि गाढवे यांच्यावर कारवाई न केल्यास संबंधित ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांमध्ये मोकाट कुत्री अन् गाढवे सोडण्याचे आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी गटविकास अधिकार्यांना दिली. या वेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपजिल्हा समन्वय विक्रम चौगुले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला
पुणे शहरातील रस्त्यांवर केवळ ५४ खड्डेच !
उसप गावातील प्रस्तावित दगड खाण आणि क्रशर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध
पत्नीचा छळ करून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी
मोरजी येथे घर पाडण्याच्या कारवाईच्या वेळी रहिवाशाचा आत्महत्येचा प्रयत्न