सर्वोच्‍च न्‍यायालयाचा निर्णय आमच्‍या बाजूने न लागल्‍यास रक्‍तपात होईल ! – शरद कोळी, ठाकरे गटाचे नेते

शरद कोळी

चंद्रपूर – सर्वोच्‍च न्‍यायालयात आमच्‍या बाजूने निर्णय लागला नाही, तर रस्‍त्‍यावर रक्‍तपात होईल, असे धक्‍कादायक विधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते शरद कोळी यांनी २८ फेब्रुवारी या दिवशी येथे केले. एकीकडे महाराष्‍ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्‍च न्‍यायालयात चालू आहे, तर यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्‍यबाण चिन्‍ह आणि शिवसेना नाव हे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सध्‍या सर्वोच्‍च न्‍यायालयात युक्‍तीवादाच्‍या वेळी सांगितली जात आहे. अशी सर्व परिस्‍थिती असतांना कोळी यांनी असे वक्‍तव्‍य केल्‍याने सर्वांना धक्‍का बसला आहे.

शरद कोळी म्‍हणाले की, आमचा आणि जनता यांचा कायद्यावरील विश्‍वास उडाला आहे. कायदा पंतप्रधान नरेंद्री मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शिंदे-फडणवीस यांनी विकत घेतला आहे, अशी घणाघाती टीका त्‍यांनी केली.