नागपूर येथे आमदार नितीन देशमुख यांची जलसंघर्ष यात्रा पोलिसांनी रोखली !

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख हे जलसंघर्ष यात्रा घेऊन येथील सीमेवर आले; मात्र पोलिसांनी त्यांची संघर्ष यात्रा धामना गावात अडवली. पोलिसांनी त्यांना कह्यात घेतले.

राज्यातील राजकारण नव्या वळणावर…?

मागील काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी, जेपीसी आणि मोदी यांची पदवी या ३ सूत्रांसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा वेगळी मते मांडली.

उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा ! – किरीट सोमय्या, नेते, भाजप

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ‘लाइफलाईन’ आस्थापन यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे केली.

रेशन दुकानांतून वितरित करण्यात येणारा तांदूळ खाण्यायोग्य आहे ! – अमोल पाठक, तहसीलदार, कुडाळ

‘फोर्टिफाइड’ तांदूळ हा नियमितचे तांदूळ आणि इतर पोषक पदार्थ एकत्र करून बनवला जातो. त्याचे पोषणमूल्य अधिक असून शारीरिक स्वास्थ्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. (व्हिडिओ पहा)

केंद्रीय मंत्री नारायण राणे अलीबाग न्यायालयाकडून दोषमुक्त !

त्यांच्या विरोधात पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याने न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. हा निर्णय अलीबाग मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांनी दिला आहे.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी राहुल गांधी यांना क्षमा मागण्यास भाग पाडले पाहिजे ! – रणजीत सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान

राहुल गांधी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

उद्धव ठाकरे गट सध्‍या तरी ‘मशाल’ चिन्‍ह वापरू शकणार !

उद्धव ठाकरे गटाला २७ मार्च या दिवशी सर्वोच्‍च न्‍यायालयातून पुढील आदेशापर्यंत ‘मशाल’ हे निवडणूक चिन्‍ह म्‍हणून वापरण्‍याची मुभा मिळाली आहे. मशाल चिन्‍हावर दावा करणारी समता पार्टीची याचिका सर्वोच्‍च न्‍यायालयाने फेटाळून लावली आहे.

महाराष्ट्रातील शिंदे आणि ठाकरे गट यांची सर्वोच्च न्यायालयात चालू असलेली सुनावणी अंतिम टप्प्यात !

१५ मार्च या दिवशी झालेल्या सुनावणीत ‘तत्कालीन राज्यपालांची भूमिका ही संविधानाच्या चौकटीत होती’ असा युक्तिवाद शिंदे गटाकडून करण्यात आला.

दापोलीचे तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना ‘ईडी’कडून अटक !

मुरुड येथील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी ‘ईडी’ने दापोली तालुक्याचे माजी प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना १४ मार्चला अटक केली.

सिंधुदुर्ग : असुविधांच्या निषेधार्थ माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावर गुरे बांधून आंदोलन !

आरोग्य सुविधेसारख्या मूलभूत आवश्यकतांसाठी आंदोलन करावे लागणे, प्रशासनाला लज्जास्पद !