श्री तुळजाभवानी मंदिरातील देवनिधी लुटणार्‍यांविरुद्ध गुन्हे नोंदवा !

सीआयडीच्या चौकशी अहवालात अपहार झाल्याचे सिद्ध झाले असतांनाही प्रशासनाने आरोपींना वाचवण्यासाठी नव्याने चौकशी चालू करणे, हा विधीमंडळाचा हक्कभंग आहे आणि न्यायालयाचा अवमान आहे.

तुळजापूर येथे शिवरायांना भवानी तलवार देतांनाचे १०८ फुटी शिल्प उभारणार ! – राणा जगजितसिंह पाटील, आमदार, भाजप

छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत असलेल्या श्री तुळजाभवानीमातेचे १०८ फुटी शिल्प तुळजापूर येथे उभारण्यात येणार आहे. यासाठी २५० कोटी रुपये व्यय करण्यात येणार आहे. या निधीमध्ये लोकसहभागही असणार आहे

श्री तुळजाभवानी देवीच्या सिंहासन पूजेच्या ‘पास’ची चौकशी करण्यात यावी !

निवेदनात पुढे म्हटले आहे की, सिंहासन पूजा या प्रतिदिन ७ होत आहेत का ?, तसेच होत असल्यास पूजेचे बुकिंग कसे झाले ?, याची सखोल चौकशी करण्यात यावी.

कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने ६ लाख भाविकांनी घेतले श्री भवानीदेवीचे दर्शन !

सर्वाधिक भाविक सोलापूर येथून पायी चालत दर्शनासाठी आले होते. या मार्गावरील सर्व वाहतूक दोन दिवसांपूर्वी बंद करण्यात आली होती. ही वाहतूक बायपास मार्गे ५० किलोमीटर अंतरावरून वळवण्यात आली होती.

कुंकवाची उधळण करत श्री तुळजाभवानीदेवीचे सीमोल्लंघन मोठ्या उत्साहात साजरे !

सहस्रो भाविकांच्या उपस्थितीत आणि कुंकवाची उधळण करत विजयादशमीच्या पहाटे श्री तुळजाभवानीदेवीचे सीमोल्लंघन साजरे झाले. भिंगार (जिल्हा नगर) येथून आलेल्या मानाच्या पलंग पालखीचे तुळजाभवानी मंदिरात आगमन झाले.

श्री तुळजाभवानीदेवीची सातव्या दिवशी भवानी तलवार अलंकार महापूजा !

श्री तुळजाभवानीदेवीची सातव्या दिवशी भवानी तलवार अलंकार महापूजा !

श्री तुळजाभवानीदेवीची पाचव्या दिवशी मुरली अलंकार पूजा !

श्री तुळजाभवानीदेवीची चौथ्या दिवशी रथ अलंकार महापूजा बांधली होती. ही महापूजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी अर्पण केलेल्या सुवर्ण अलंकारात बांधली होती.

श्री तुळजाभवानी मंदिरात दुपारी १२ वाजता होणार विधीवत् घटस्थापना !

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव १७ सप्टेंबर या दिवशी देवीच्या मंचकी निद्रेपासून चालू झाला आहे. २६ सप्टेंबर या दिवशी पहाटे आणि सकाळी श्री तुळजाभवानीदेवीची अभिषेक पंचामृत महापूजा, नैवेद्य, तसेच दुपारी १२ वाजता घटस्थापना होणार आहे.

मंदिराच्या परिसरात भीक मागणार्‍या १८ बालकांना बालसुधारगृहात पाठवले !

येथील श्री तुळजाभवानी मंदिर परिसर आणि शहरात भीक मागणार्‍या १८ बालकांना ‘बाल संरक्षण समिती’च्या पथकाने कारवाई करत कह्यात घेतले. बालकांमध्ये १५ मुले आणि ३ मुली यांचा समावेश आहे.

श्री तुळजाभवानीदेवीच्या मंचकी निद्रेला प्रारंभ !

महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानीदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी मंचकी निद्रेस दिनांक १७ सप्टेंबरपासून ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात प्रारंभ झाला. सायंकाळी नैवेद्य, धुपारती झाल्यानंतर मानकरी पुजार्‍यांनी आरती करून देवीची दृष्ट काढली.