श्री तुळजाभवानी मंदिरात दुपारी १२ वाजता होणार विधीवत् घटस्थापना !

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव १७ सप्टेंबर या दिवशी देवीच्या मंचकी निद्रेपासून चालू झाला आहे. २६ सप्टेंबर या दिवशी पहाटे आणि सकाळी श्री तुळजाभवानीदेवीची अभिषेक पंचामृत महापूजा, नैवेद्य, तसेच दुपारी १२ वाजता घटस्थापना होणार आहे.

मंदिराच्या परिसरात भीक मागणार्‍या १८ बालकांना बालसुधारगृहात पाठवले !

येथील श्री तुळजाभवानी मंदिर परिसर आणि शहरात भीक मागणार्‍या १८ बालकांना ‘बाल संरक्षण समिती’च्या पथकाने कारवाई करत कह्यात घेतले. बालकांमध्ये १५ मुले आणि ३ मुली यांचा समावेश आहे.

श्री तुळजाभवानीदेवीच्या मंचकी निद्रेला प्रारंभ !

महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानीदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी मंचकी निद्रेस दिनांक १७ सप्टेंबरपासून ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात प्रारंभ झाला. सायंकाळी नैवेद्य, धुपारती झाल्यानंतर मानकरी पुजार्‍यांनी आरती करून देवीची दृष्ट काढली.

श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्रोत्सवाच्या यशस्वीतेसाठी संबंधितांनी दायित्वाने काम करावे !

शारदीय नवरात्र महोत्सवास १७ सप्टेंबर २०२२ या दिवशी प्रारंभ होणार असून ११ ऑक्टोबर २०२२ पर्यंत विविध पूजाविधी होणार आहेत. या कालावधीत महाराष्ट्रासह देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक तुळजापूर येथे दर्शनासाठी येतात.

श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्रोत्सवाच्या यशस्वीतेसाठी संबंधितांनी दायित्वाने काम करावे !

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव २०२२ च्या यशस्वीतेसाठी विविध शासकीय विभागाकडे दायित्व देण्यात आले आहे.

तुळजापूर येथील घाटशीळ मंदिराचे शिखर आणि तटबंदी यांवर झुडुपे उगवत असल्याने वास्तूला धोका !

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवीच्या वास्तव्याने पुनित झालेल्या तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील अतीप्राचीन असलेल्या घाटशीळ मंदिराच्या परिसरातील शिखर आणि तटबंदी यांवर लहान आकाराची झुडुपे उगवली आहेत.

पाच वर्षांनंतरही दोषींविरुद्ध गुन्हे का नोंद केले नाहीत ?

उच्च न्यायालयाकडून गृह विभाग आणि पोलीस यांना नोटिसीद्वारे विचारणा

श्री भवानीदेवीचे सायंकाळचे अभिषेक चालू !

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने  ७ जुलैपासून सायंकाळी ७ ते रात्री ९ या कालावधीत अभिषेक पूजा चालू केली, अशी माहिती माजी नगराध्यक्ष आणि श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त सचिन रोचकरी यांनी दिली आहे.

उमरखेड (जिल्हा यवतमाळ) येथील ‘चिन्मय मूर्ती संस्थान’च्या वतीने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला ५ लाख रुपयांचा धनादेश !

‘चिन्मय मूर्ती संस्थान’चे मठाधिपती पूजनीय माधवानंद महाराज यांच्या आज्ञेनुसार संस्थाननी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला ५ लाख रुपयांचा धनादेश दिला.

श्री तुळजाभवानी मंदिरात भ्रष्टाचार केलेल्यांना सरकारने पाठीशी न घालता त्यांच्यावर तात्काळ गुन्हे नोंदवावेत ! – पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी, संस्थापक सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद

श्री तुळजाभवानी मंदिरात ८ कोटी ४५ लाख रुपयांहून अधिक रकमेचा अपहार ठेकेदार आणि शासकीय अधिकारी यांच्या संगनमताने झाला. अद्याप दोषींवर कारवाई नाही !