श्री तुळजाभवानीदेवीचे २०७ किलो सोने वितळवण्यास विधी विभागाची अनुमती !

मंदिरांचे सरकारीकरण झाल्यास तेथे कशा प्रकारे व्यवहार चालतात, याचे हे उदाहरण होय ! त्यामुळे मंदिरे भक्तांच्या कह्यात देणे आवश्यक !  

श्री तुळजाभवानीदेवीचे मौल्यवान अलंकार हरवल्याच्या प्रकरणाचा अहवाल सादर होण्यापूर्वीच फुटला !

अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यापूर्वीच कसा फुटला ? एक अहवालही सांभाळू न शकणारे मंदिराचे प्रशासन देवीचे अलंकार कधीतरी सांभाळू शकेल का ?

दुष्काळ स्थिती भोगणार्‍या मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांची ४५ सहस्र कोटींच्या निधीची घोषणा !

मुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी ४५ सहस्र कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. यात सिंचनासाठी २७ सहस्र कोटी रुपयांच्या निधीला संमती देण्यात आली आहे

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या ‘१०८ भक्तनिवास’ इमारतीत गळती !

भक्तांच्या पैशांतूनच उभारण्यात येणार्‍या इमारतीचे बांधकाम चांगल्या दर्जाचे होत नसेल, तर सरकारीकरण झालेल्या श्री तुळजाभवानी मंदिराचा अन्य कारभार सुरळीत असेल का ?

श्री तुळजाभवानीदेवीचे दागिने गहाळ झाल्याच्या प्रकरणात जिल्हाधिकार्‍यांनी भूमिका स्पष्ट करावी ! – किशोर गंगणे, माजी अध्यक्ष, पुजारी मंडळ

‘मंदिरांमध्ये भ्रष्टचार चालतो’, अशी कारणे पुढे करून मंदिरांचे सरकारीकरण केले जाते; पण कालांतराने सरकारीकरण झालेल्या मंदिरांत भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्यावर मात्र आळीमिळी गूपचिळी साधली जाते !

तुळजापूर मंदिरातील गहाळ दागिन्यांची सरकारने त्वरित चौकशी करावी ! – आमदार मंदा म्हात्रे, भाजप

महाराष्ट्राची कुलदेवता तुळजापूर मंदिरतील भवानीदेवीचे पुरातन दागिने आणि वस्तू गहाळ झाल्या आहेत. हे दागिने पुन्हा मिळवण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करण्याचा आदेश द्यावा.

श्री तुळजाभवानीदेवीच्‍या गहाळ अलंकारांविषयी चौकशी व्‍हावी !

देवीच्‍या दागिन्‍यांची मोजणी ‘ऑन कॅमेरा’ करावी, अशी मागणी करावी लागणे, हे लज्‍जास्‍पद आहे. मंदिरांचे सरकारीकरण झाल्‍यामुळेच देवीचे दागिने चोरीला जात आहेत. यासाठी मंदिरांचे विश्‍वस्‍त भक्‍तच हवेत !

अभिषेक पूजेवरील कर अल्‍प करावा, तसेच अभिषेक पूजेची संख्‍या वाढवण्‍यात यावी !

श्री तुळजाभवानी मातेच्‍या दर्शनासाठी प्रतिदिन सहस्रो भाविक येतात. देवीला अभिषेक पूजा हा भाविकांच्‍या आस्‍थेचा विषय आहेे; मात्र मंदिराच्‍या वाढीव करामुळे, तसेच अभिषेक संख्‍या अल्‍प केल्‍यामुळे सर्वसामान्‍य भाविक अभिषेक पूजेपासून वंचित रहात आहेत.

श्री तुळजाभवानीदेवीच्‍या अभिषेक पूजेच्‍या दरवाढीचा निर्णय रहित करावा !

निवेदनात म्‍हटले आहे की, मंदिर प्रशासनाने अभिषेक दरवाढ ५० रुपयांवरून थेट ५०० रुपयांवर करण्‍याचा निर्णय घेतला. तूर्तास या निर्णयाला स्‍थगिती दिली आहे.

दोषी अधिकार्‍यांवर कठोरातील कठोर कारवाई करा ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीने मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या संभाजीनगर खंडपिठामध्‍ये सरकारीकरण झालेल्‍या तुळजापूर देवस्‍थानातील घोटाळ्‍यांच्‍या संदर्भात, तसेच देवीचे अलंकार गहाळ झाल्‍याविषयी याचिका प्रविष्‍ट केली होती.