भागवत एकादशीनिमित्त श्री तुळजाभवानीदेवीची शेषशाही अलंकार महापूजा !
पौराणिक कथेनुसार भगवान विष्णु शेषशय्येवर विश्राम करतांना त्यांच्या नेत्रकमलात मातेस विश्राम मिळाला. त्यानंतर ब्रह्मदेवांच्या स्तुतीने देवीने जागृत होऊन दैत्यांचा संहार केला.
पौराणिक कथेनुसार भगवान विष्णु शेषशय्येवर विश्राम करतांना त्यांच्या नेत्रकमलात मातेस विश्राम मिळाला. त्यानंतर ब्रह्मदेवांच्या स्तुतीने देवीने जागृत होऊन दैत्यांचा संहार केला.
पापनाश तीर्थ कुंडातून प्रारंभ झालेल्या या जलयात्रेत शेकडो महिला भक्तांनी डोक्यावर पवित्र जलकलश घेऊन भक्तीभावाने सहभाग घेतला.
१ जानेवारी या दिवशी श्री क्षेत्र तुळजापूर येथे कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवीची ‘भवानी तलवार अलंकार’ महापूजा उत्साहात पार पडली. हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांना देवीने ‘भवानी तलवार’ प्रदान केली होती.
३० डिसेंबर या दिवशी शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने श्री तुळजाभवानीदेवीची मुरली अलंकार महापूजा भावपूर्ण वातावरणात पार पडली. या वेळी देवीच्या अलंकारांमध्ये मुरलीला विशेष स्थान दिले होते.
देवीच्या एका हातात चाबूक, तर दुसर्या हातात घोड्यांचा लगाम धारण केलेला अलंकार विशेष आकर्षण ठरला. देवीचे तेजस्वी आणि ऐश्वर्यपूर्ण स्वरूप अधिक खुलून दिसत होते.
‘श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान’च्या वतीने देवीच्या चरणी अर्पण करण्यात येणार्या फुलांपासून सेंद्रिय उदबत्ती सिद्ध करण्याचा पर्यावरणपूरक आणि पवित्र उपक्रम चालू करण्यात आला आहे. वाढत्या भाविक संख्येमुळे साचणार्या निर्माल्याचा योग्य वापर व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
श्री तुळजाभवानीदेवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास २८ डिसेंबरला घटस्थापनेने भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. दुपारी १२ वाजता मुख्य यजमान श्री. उल्हास अनंतराव कागदे यांच्या हस्ते मंदिरातील गणेश विहारात सपत्नीक विधीवत घटस्थापना करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी यांनी नुकतेच श्री तुळजाभवानीदेवी आणि पाचवे ज्योतिर्लिंग असलेले प्रभु वैद्यनाथ यांचे भक्तीभावाने दर्शन घेतले.
देवीची ही निद्रा आता २८ डिसेंबरअखेर चालेल. या दिवशी पहाटे देवी सिंहासनावर परत विराजमान होईल, तसेच दुपारी १२ वाजता घटस्थापनेने शाकंभरी नवरात्रोत्सवास प्रारंभ होईल.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या श्री तुळजाभवानीदेवीची मंचकी निद्रा २० डिसेंबर या दिवशी चालू होत आहे. त्या निमित्ताने सायंकाळची अभिषेक पूजा सायंकाळी ७ पर्यंत पूर्ण होईल.