झारखंड सरकारच्या विरोधात आमरण उपोषण करणार्‍या जैन साधूंचा प्राणत्याग !

झारखंडमधील जैन समाजाच्या ‘सम्मेद शिखरजी’ हे तीर्थक्षेत्र वाचवण्यासाठी आमरण उपोषणाला बसलेले मुनी सुग्यसागर महाराज यांनी प्राणत्याग केला. ‘सम्मेद शिखरजी’ला पर्यटनस्थळ बनवण्याच्या झारखंड राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आमरण उपोषण करत होते.

सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळाऐवजी तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी जैन समाजाचा इचलकरंजी (कोल्हापूर) येथे मोर्चा !

झारखंड सरकारने जैन धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळाचा दिलेला दर्जा रहित करून तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी जैन समाजाने २६ डिसेंबरला प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी निवेदन स्वीकारले.

‘सम्मेद शिखर’ या जैन तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ बनवण्याच्या विरोधात राजस्थानमध्ये जैन समाज रस्त्यावर !

झारखंडमधील जैन तीर्थक्षेत्र सम्मेद शिखर याला पर्यटन स्थळ बनवण्यात येणार आहे. याच्या विरोधात राजस्थानमध्ये जैन समाजाकडून गेल्या ३ दिवसांपासून प्रखर विरोध केला जात आहे.

आयुर्वेद आणि निसर्गाेपचार यांना प्रोत्साहन दिल्यास गोव्यातील पर्यटनामध्ये वाढ होईल ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

गोव्यात स्वतंत्र आयुष खाते चालू करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पर्यटनविकासासाठी राज्यशासन जिल्हा समन्वयक नियुक्त करणार !

पर्यटन विकासाचा समन्वय आणि सनियंत्रण साधण्यासाठी सर्व जिल्ह्यांत जिल्हा समन्वयक नियुक्त करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. सर्व माहिती एकत्रित करून शासनाला सादर करण्याचे काम जिल्हा समन्वयक करणार आहे.

किनार्‍यांवर अनधिकृत कृत्ये करणार्‍यांना कोठडीत टाकण्याचे पोलिसांना अधिकार ! – रोहन खंवटे, पर्यटनमंत्री

पर्यटन खात्याने प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार फौजदारी दंड संहितेच्या कलम १८८ अंतर्गत पोलीस अधिकारी नियमांचे उल्लंघन करणार्‍याला कोठडीत टाकू शकणार आहेत, अशी चेतावणी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली आहे.

शासकीय अनास्थेमुळे रायगडावरील पर्यटन महामंडळाच्या निवासस्थानाचे नूतनीकरण रखडले ! – विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच

स्वराज्याची राजधानी रायगड येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानाचे नूतनीकरण वर्ष २०१७ पासून रखडले आहे. माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनुसार गेल्या पावणेचार वर्षांपासून या निवासस्थानाच्या नूतनीकरणाचे काम करण्यात येत आहे.

गोवा : डेक बेड आणि कचरा विल्हेवाट शुल्कात पर्यटन खात्याकडून कपात

राज्य पर्यटन खात्याने आज एका सार्वजनिक सूचनेद्वारे शॅक व्यावसायिकांना दिलासा देणारी घोषणा केली. डेक बेड आणि कचरा विल्हेवाट यांच्या शुल्कात पर्यटन खात्याकडून अंदाजे ४० ते ५० टक्के कपात करण्यात आली आहे.

गोव्यात २० टक्के मृत्यू हे मद्यप्राशनामुळे ! – डॉ. शिवानंद बांदेकर, अधिष्ठाता, गोवा वैद्यकीय महाविद्यालय

पर्यटन वाढीसाठी आणि महसूलप्राप्तीसाठी आतापर्यंतच्या सर्व शासनांनी मद्यालयांना मुक्तहस्त दिला आहे; पण त्याचा परिणाम मात्र गोमंतकियांना भोगावा लागत आहे !

भूतान : गरीब देशातील ‘श्रीमंत’ लोक !

भारतापेक्षा ८६ पटींनी लहान असणारा भूतान पर्यटनवाढीला नाही, तर निसर्गरक्षणास आणि त्या मार्गान्वये जनतेच्या आनंदास प्राधान्य देतो. हीच वास्तविक श्रीमंती आहे ! याउलट भारतात विकासाच्या नावाखाली सर्रासपणे निसर्गाचा र्‍हास केला जातो ! भारतासाठी हे अत्यंत लज्जास्पद !