नगर येथील रेखा जरे हत्या प्रकरण

नगर, ५ मार्च – येथील रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला पसार घोषित करण्याच्या मागणीचा अर्ज पारनेर न्यायालयाने संमत केला आहे. त्याला पोलिसांसमोर हजर होण्यासाठी १ मासाची मुदत दिली असून त्यानंतर संपत्ती जप्तीची कारवाई केली जाईल, अशी माहिती तपास अधिकारी पोलीस अधीक्षक अजित पाटील यांनी दिली.
या काळात पोलीस आरोपीची छायाचित्रे सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध करून हजर होण्याचे आणि लोकांना त्याला पकडून देण्याचे आवाहन करू शकतात. त्यानंतर आरोपीच्या नावावरील संपत्ती जप्त करणे, बँक खाती सील करणे या कारवाईचा पोलिसांचा मार्ग मोकळा होईल. बोठे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने यापूर्वीच फेटाळला आहे.
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
थोडक्यात महत्वाचे : (२२.०७.२०२६)