शस्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानच्या आक्रमणात कोल्हापूर जिल्ह्यातील सैनिक संग्राम पाटील हुतात्मा !
शस्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानने केलेल्या आक्रमणात राजौरी येथे करवीर तालुक्यातील निगवे-खालसा येथील हवालदार संग्राम पाटील (३७ वर्षे) हे २१ नोव्हेंबर या दिवशी हुतात्मा झाले आहेत. ते गेली १७ वर्षे मराठा बटालीयनमध्ये सेवा बजावत होते.