ब्रिटनचे ‘पाकिस्तानी ‘ऑफकॉम’!

पाक हा आतंकवाद जोपासणारा, आतंकवादी हाफीज इत्यादींची मानमरातब करणारा, त्यांना संरक्षण देणारा आणि आतंकवादाचे उगमस्थान असणारा, जगभरात आतंकवाद निर्माण करणारा ओसामा बिन लादेन, दाऊद इब्राहीम यांना पाक वास्तव्याला सुरक्षित ठिकाण वाटत असेल, तर तेथील प्रत्येकाला आतंकवादी म्हटल्यास वावगे काय ?

बंगालमधील मुसलमानबहुल भागात हिंदूंना मतदान करण्यापासून रोखले जाते ! – सर्वोच्च न्यायालयात याचिका

केवळ बंगालमध्येच नव्हे, तर अन्य राज्यांतील मुसलमानबहुल भागात असे होते का ? याची माहिती आता निवडणूक आयोगाने आणि तेथील सरकारने घेतली पाहिजे आणि जर असे होत असेल, तर तेथे हिंदूंना संरक्षण देत त्यांना मतदान करू दिले पाहिजे !

पाकिस्तानी सैन्याच्या बलुची नागरिकांवरील अत्याचारांविरोधात आवाज उठवणार्‍या करिमा बलुच यांचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू

बलुचिस्तानसाठी लढणार्‍या व्यक्तीचा अशा प्रकारे संशयास्पदरित्या मृत्यू होण्याचे हे काही पहिलेच प्रकरण नाही. पत्रकार साजिद हुसैन यांचा ही असाच मृत्यू झाला होता !

कुलगाममध्ये २ आतंकवादी शरण

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोएबाच्या २ स्थानिक आतंकवाद्यांनी ‘त्यांच्या कुटुंबियांच्या आवाहनानंतर आत्मसमर्पण केले’, असे पोलिसांनी सांगितले.

अफजलखान वधाच्या दिवशी ट्विटरवरील #ShivPratapDin हॅशटॅग ट्रेंड चौथ्या स्थानी !

या ट्रेंडमध्ये धर्मप्रेमींनी ‘वर्तमानस्थितीत आतंकवाद नष्ट करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा ही युद्धनीती अवलंबण्याची आवश्यकता आहे’, असे सांगितले.

किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी असणारी अफझलखान आणि सय्यद बंडा यांची कबर परिसर शिवभक्तांना पहाण्यासाठी खुला करावी ! – श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाची निवेदनाद्वारे मागणी

शिवप्रतापामुळे आजच्या युवकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा, हुशारी आणि युद्धनीती यांचीही जाणीव होते. त्यामुळे हा परिसर तात्काळ खुला करण्याची आवश्यकता आहे.

जिहादी आतंकवाद आणि शहरी नक्षलवाद यांच्या अभद्र आघाडीचे नवी देहली प्रयोगकेंद्र ! – कपिल मिश्रा, माजी आमदार, नवी देहली

देशाला हिंदुस्थान म्हटले जाऊ शकते, तर हिंदु राष्ट्र का नाही ? प्रत्येक वेळी अल्पसंख्यांकांनीच का ठरवायचे की, देशाने कोणत्या दिशेला जायला हवे ? हिंदूंनी आपल्यासाठी विचार करू नये का ?

काबूलमध्ये ५ बॉम्बस्फोटांत ९ जण ठार

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एका पाठोपाठ ५ साखळी बॉम्बस्फोटांमध्ये ९ जण ठार झाले, तर २० हून अधिक जण घायाळ झाले. शहरातील विविध भागांत हे स्फोट झाले.

वॉशिंग्टन (अमेरिका) येथील भारतीय दूतावासासमोरील म. गांधी यांचा पुतळा खलिस्तानी झेंड्याद्वारे झाकला !

सरकारने शेतकर्‍यांच्या आंदोलनातील खलिस्तानवाद्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी !

आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍या काश्मीरमधील काँग्रेसच्या नेत्याला अटक

जम्मू-कश्मीर पोलिसांनी शोपिया जिल्ह्यात आतंकवाद्यांना पळून जाण्यास साहाय्य केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते अधिवक्ता गौहर अहमद वानी यांना अटक केली आहे.