भोपाळ येथील काँग्रेसचे आमदार आरिफ मसूद यांच्या विरोधात अटक वॉरंट

फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या विरोधात विनाअनुमती मोर्चा काढून भडकावू भाषण दिल्याचे प्रकरण

फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी महंमद पैगंबर यांच्याविषयी विधान केल्यावर भारतात त्याचा विरोध केला जातो, तर किती हिंदू आणि त्यांचे लोकप्रतिनिधी भारतात त्याच्या देवतांचा अवमान केल्यावर त्याला विरोध करतात ?

भोपाळ (मध्यप्रदेश) – फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या महंमद पैगंबर यांच्याविषयीच्या विधानाच्या विरोधात काँग्रेसचे आमदार आरिफ मसूद यांनी येथील इक्बाल मैदानावर विनाअनुमती मोर्चा काढला होता. तसेच येथे भडकावू भाषण दिले होते.

या प्रकरणी पूर्वी ६ जणांना अटक करण्यात आली होती. आता न्यायालयाने मसूद यांना अटक करण्याचा वॉरंट जारी केला आहे.