इंफाळ (मणीपूर) – राज्यातील काकचिंगमध्ये १४ डिसेंबरच्या सायंकाळी कुकी ख्रिस्ती आतंकवाद्यांनी २ हिंदु मजुरांची गोळ्या झाडून हत्या केली. सुनालाल कुमार (वय १८ वर्षे) आणि दशरथ कुमार (वय १७ वर्षे) अशी या मजुरांची नावे आहेत. ते बिहारच्या गोपालगंज येथील रहिवासी होते.
दुसरीकड थौबल येथे पोलिसांची आतंकवादी गटाशी झालेल्या चकमकीत एका आतंकवाद्याचा मृत्यू झाला, तर ६ आतंकवाद्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी पोलिस शस्त्रालयातून ही शस्त्रे लुटण्यात आली होती.
संपादकीय भूमिकामणीपूरमध्ये ख्रिस्ती आतंकवाद्यांकडून हिंदूंना वेचून ठार करण्यात येत असतांना त्याविषयी भारतातील एकही राजकीय पक्ष काही बोलत नाही, हे संतापजनक ! |