मोसूल (इराक) येथे ‘इस्लामिक स्टेट’ने तोडफोड केलेले जुने चर्च मुसलमानांनी पुन्हा उभारले !

पलायन केलेल्या ख्रिस्त्यांनाही परतण्याचे आवाहन

इराकमधील मुसलमानांकडून भारतातील धर्मांध बोध घेतील का ? काश्मीरमधील तोडफोड केलेल्या शेकडो मंदिरांची डागडुजी करून हिंदूंना परत काश्मीर खोर्‍यात बोलावतील का ? असा प्रश्‍न उपस्थित होतो.  

मोसूल (इराक) – इस्लामिक स्टेटचा (आय.एस्.चा) गड समजल्या जाणार्‍या मोसूलमध्ये वर्ष २०१७ मध्येच आय.एस्.चा नायनाट करण्यात आला. आय.एस्.च्या जिहादी आतंकवाद्यांनी यापूर्वी तोडफोड केलेल्या २०० वर्षे जुन्या सेंट थॉमस चर्चची आता येथील मुसलमान तरुणांनी डागडुजी केली आहे. ‘नाताळच्या निमित्ताने सुमारे ४५ सहस्र ख्रिस्त्यांना परत बोलावता येऊ शकेल’, अशी आशा त्यांना वाटते.

मोसूलची लोकसंख्या सुमारे ६ लाख ७० सहस्र आहे. येथे पूर्वी ४५ सहस्रांहून अधिक ख्रिस्ती रहात होते. वर्ष २०१४ मध्ये इस्लामिक स्टेटने आक्रमण करून चर्चची तोडफोड केली, तसेच ख्रिस्त्यांची लुटमार केली. त्यामुळे ख्रिस्त्यांनी पलायन केले. आता मुसलमान तरुणांनी चर्चची डागडुजी करून ख्रिस्त्यांना परत येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे सध्या ५० ख्रिस्ती कुटुंबे परतली आहेत.