हिंदूंनी केलेल्या विरोधाचे फलित !

म्हापसा, २३ एप्रिल (वार्ता.) – मुसलमान असल्याच्या सूत्रावरून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर येथील उद्योजक सलीम इसानी यांनी गणेशपुरी, म्हापसा येथील श्री गणेशपुरी विश्वस्त मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यत्वाचे त्यागपत्र दिले आहे.
सुमारे २१ दिवसांपूर्वी श्री गणेशपुरी विश्वस्त मंडळाच्या ११ सदस्यीय कार्यकारिणीची वर्ष २०२२ ते २०२५ या कालावधीसाठी बिनविरोध निवड झाली होती आणि यामध्ये प्रथमच एक महिला आणि सलीम इसानी या मुसलमान धर्मीय व्यक्ती यांसामावून घेण्यात आले होते. विश्वस्त मंडळाच्या नियमावलीनुसार गणेशपुरी वसाहतीत वास्तव्यास असलेल्या कोणत्याही धर्मातील पुरुष अथवा स्त्री विश्वस्त होऊ शकते आणि त्यानुसार सलीम इसानी हे वर्ष १९९३ पासून मंडळाचे विश्वस्त आहेत; मात्र ‘सलीम इसानी मुसलमान असल्याने त्यांनी कार्यकारिणीवरील एखादे पद भूषवणे अयोग्य आहे’, असे मत स्थानिक रहिवासी खासगीत बोलतांना व्यक्त करत होते. ‘मुसलमान संस्थांच्या कार्यकारिणीवर हिंदूंना घेतले जात नाही, त्यामुळे केवळ श्री गणेशपुरी विश्वस्त मंडळानेच वेगळा पायंडा घालणे अयोग्य ठरते’, असे मत अनेकांकडून व्यक्त होत होते. या पार्श्वभूमीवर सलीम इसानी यांनी श्री गणेशपुरी विश्वस्त मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यत्वाचे त्यागपत्र दिले आहे.
Goalpara School Beef Row : आसाममधील एका शाळेत मुसलमान विद्यार्थ्यांकडून हिंदु विद्यार्थ्यांना गोमांस भरवण्याचा प्रयत्न
हडफडे आग दुर्घटनेच्या प्रकरणी न्यायदंडाधिकार्यांचा अहवाल झाकलेलाच !
रुमडामळ, मडगाव येथे मुसलमानाकडून गोरक्षक रेडकर यांच्यावर आक्रमण
हरित, स्वच्छ आणि नितळ गोवा साकारण्यासाठी लोकांचा सहभाग अत्यावश्यक ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत
संपादकीय : हिंदू जात्यात !
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !