थोडक्यात महत्वाचे . . .

शिवसेनेच्‍या ‘धनुष्‍यबाण’ या पक्षचिन्‍हाविषयी ६ डिसेंबर या दिवशी सर्वोच्‍च न्‍यायालयात सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने ‘धनुष्‍यबाण’ हे पक्षचिन्‍ह आणि ‘शिवसेना’ हे नाव एकनाथ शिंदे यांच्‍या पक्षाला दिले आहे.

बांगलादेशातील हिंदूंच्‍या रक्षणासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत ! – सतीश कोचरेकर, मुंबई प्रवक्‍ते, हिंदु जनजागृती समिती 

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्‍याचार थांबण्‍यासाठी भारत सरकारने हस्‍तक्षेप करावा, यासाठी केंद्र सरकारला देण्‍यात येणार्‍या निवेदनावर नागरिकांकडून स्‍वाक्षर्‍या घेण्‍यात आल्‍या. 

भाजप आणि राष्‍ट्रवादी यांच्‍या नेत्‍यांनी केली शपथविधीच्‍या सिद्धतेची एकत्रित पहाणी !

भाजप आणि राष्‍ट्रवादी काँग्रेस यांच्‍या नेत्‍यांनी २ डिसेंबर या दिवशी शपथविधीच्‍या सिद्धतेची एकत्रित पहाणी केली. विशेष म्‍हणजे या वेळी शिवसेनेचा एकही नेता उपस्‍थित नव्‍हता.

एकनाथ शिंदे अप्रसन्‍न हा अपप्रचार – दीपक केसरकर, प्रवक्‍ते, शिवसेना

शिवसेना आणि भाजप हे ३० वर्षांपासून एकत्र निवडणूक लढले आहेत. आमची विचारधारा एकच आहे. एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक नाही.

मंत्रीपदाच्‍या शर्यतीमधील भाजपच्‍या नेत्‍यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट !

मंत्रीपदाच्‍या शर्यतीत असलेल्‍या भाजपच्‍या नेत्‍यांनी २ डिसेंबर या दिवशी देवेंद्र फडणवीस यांची ‘सागर’ या शासकीय निवासस्‍थानी भेट घेतली.

विधानसभेतील भाजपचे गटनेते ठरवण्‍यासाठी पर्यवेक्षकांची नियुक्‍ती !

५ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदानावर मुख्‍यमंत्रीपदाचा शपथविधी होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्‍थित रहाणार आहेत.

महाराष्‍ट्रात सायंकाळी वाढलेल्‍या मतदानाची टक्‍केवारी योग्‍यच ! – निवडणूक आयोग

या निवडणुकीत राज्‍यात १ लाखाहून अधिक मतदानकेंद्रे होती. तेथे सायंकाळी ६ पर्यंत आलेल्‍या नागरिकाचे उशिरापर्यंत मतदान घेण्‍यात आले. त्‍यामुळे महाराष्‍ट्रात सायंकाळी वाढलेल्‍या मतदानाची टक्‍केवारी योग्‍यच आहे, अशी भूमिका महाराष्‍ट्राचे मुख्‍य निवडणूक अधिकारी एस्. चोक्‍कलिंगम् यांनी स्‍पष्‍ट केली आहे.

देशाच्‍या सुरक्षेच्‍या दृष्‍टीने महत्त्वाच्‍या पदांवर चारित्र्यवान व्‍यक्‍ती असल्‍या पाहिजेत ! – अविनाश धर्माधिकारी, चाणक्‍य मंडल परिवार

पाकिस्‍तान आणि चीनपेक्षा देशांतर्गत असलेला भ्रष्‍टाचार हा भारताच्‍या सुरक्षिततेतील सर्वांत मोठा धोका आहे. भ्रष्‍ट चारित्र्य आणि अमर्यादित स्‍वार्थ यांमुळे देशाची अतोनात हानी झाली आहे.

लोकांचा विरोध असूनही धारगळ (गोवा) पंचायतीकडून ‘सनबर्न’ कार्यक्रमाला संमती

‘धारगळ येथे ‘सनबर्न’ हा इलेक्ट्रॉनिक नृत्य आणि संगीत यांचा कार्यक्रम होऊ नये’, असा ठराव पंचायतीच्या ग्रामसभेने यापूर्वी घेतलेला असूनही धारगळ पंचायत मंडळाने २ डिसेंबर या दिवशी लोकांचा विरोध डावलून धारगळ येथे ‘सनबर्न’च्या आयोजनाला संमती दिली.

उपराष्‍ट्रपती जगदीप धनखड ३ डिसेंबर या दिवशी महाराष्‍ट्रात येणार !

केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्‍थेच्‍या शतकपूर्ती स्‍थापना दिन सोहळ्‍यास प्रमुख पाहुणे म्‍हणून उपराष्‍ट्रपती मुंबईमध्‍ये येणार आहेत.