सिंधुदुर्ग : आडाळी औद्योगिक क्षेत्राच्या विकासाविषयीची वस्तूस्थिती जाणून घ्या !

अनेक छोट्या-मोठ्या आस्थापनांनी भूमी आरक्षित केली आहे. सध्या राजकीय दृष्टीने अपप्रचार चालू आहे. २४ आस्थापनांना येथे भूमी दिलेली आहे. त्याची पुढील प्रक्रिया चालू आहे. शासकीय स्तरावर सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत काही कालावधी लागतो.

सिंधुदुर्ग : आडाळी येथे औद्योगिक क्षेत्र चालू करण्यात होणार्‍या विलंबाच्या निषेधार्थ उद्या आडाळी ते बांदा मोर्चा !

या प्रकल्पाचे स्वागत करून त्यानंतर वर्षभरातच स्थानिकांनी त्यांच्या भूमी महामंडळाकडे हस्तांतर केल्या; मात्र एक दशक संपले, तरी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, शासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या नाकर्तेपणामुळे आजही येथील औद्योगिक क्षेत्रातील भूखंडांचे वाटप उद्योजकांना झालेले नाही.

सिंधुदुर्ग : सावंतवाडी येथे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणार्‍याला अटक आणि सुटका 

सावंतवाडी येथे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची तक्रार गोवा रेल्वे पोलिसांना प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने गोवा पोलिसांच्या पथकाने सावंतवाडी शहरातील देशपांडे याच्या दुकानात धाड टाकली.

सिंधुदुर्ग : स्वातंत्र्यदिनाची सुटी असूनही नळयोजनेतील बिघाड दुरुस्त करण्यात अधिकारी आणि कर्मचारी यांचा पुढाकार

ग्रामविकास अधिकारी, उपसरपंच, कर्मचारी वर्ग यांनी त्यांना मोलाची साथ देत पाण्याच्या पंपाचा बिघाड दुपारपर्यंत दूर केला. स्वातंत्र्यदिनाची सुटी असतांनाही खंडित पाणीपुरवठा सुरळीत करून ग्रामस्थांचे मन जिंकत शासकीय कर्मचार्‍यांनी विश्वासार्हता कायम राखली !

सिंधुदुर्ग : देशाच्या फाळणीच्या वेदनादायी दिवसाच्या निषेधार्थ दोडामार्ग येथे भाजपचा मूक मोर्चा

१४ ऑगस्ट या देशाच्या फाळणीच्या दिवशी सहस्रो नागरिक मृत्यूमुखी पडले. देशाच्या फाळणीच्या या वेदनादायी दिवसाच्या निषेधार्थ भाजपने दोडामार्ग शहरात मूक मोर्चा काढला.

हिंदूंवरील अत्याचार ठळकपणे मांडणे, हेच ‘सनातन प्रभात’चे वैशिष्ट्य ! – वेदमूर्ती भूषण जोशी, वेंगुर्ला

‘सनातन प्रभात’चे वैशिष्ट्य हेच आहे की, ते हिंदूंवरील अत्याचार ठळकपणे जगासमोर आणते, तर इतर माध्यमे अशा बातम्या दडपतात, असे गौरवोद्गार वेंगुर्ला येथील वेदमूर्ती भूषण जोशी यांनी ‘सनातन प्रभात’विषयी काढले !

शिरशिंगे (सिंधुदुर्ग) येथे डोंगर खचून जीवित आणि वित्त हानी होण्यापूर्वी पुनर्वसन करा ! – ग्रामस्थांची मागणी

अशी घटना घडण्यापूर्वी येथील ग्रामस्थांचे त्वरित पुनर्वसन करा, अन्यथा दुर्घटना घडून हानी झाल्यास त्याला शासन उत्तरदायी राहील, अशी चेतावणी येथील ग्रामस्थांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदनाद्वारे दिली आहे.

सिंधुदुर्ग : हत्तींमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांचे सावंतवाडी वनविभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

शेवटी हत्तींना हटवण्याविषयी येत्या १५ दिवसांत मंत्रालयात वनमंत्र्यांसह बैठक घेण्याचे आश्‍वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिल्याचे लेखी पत्र वनविभागाकडून देण्यात आल्यानंतर शेतकर्‍यांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले.

आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या घटनांचा शोध घेऊन त्या रोखण्याचा प्रयत्न करू ! – पोलीस अधीक्षक अग्रवाल, सिंधुदुर्ग

निराशा, आत्महत्येचे विचार येणे आदी समस्यांपासून सुटका होण्यासाठी समाजाने साधना करणे आवश्यक आहे !

आडाळी औद्योगिक वसाहतीतील भूखंडांचे वाटप न झाल्यास आंदोलन करणार ! – राजन तेली, माजी जिल्हाध्यक्ष, भाजप, सिंधुदुर्ग

दोडामार्ग तालुक्यातील आडाळी औद्योगिक वसाहतीतीलभूखंडांच्या वाटपाविषयी १५ दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलन केले जाईल, अशी चेतावणी भाजपचे माजी आमदार तथा माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली.