कोकण रेल्वेच्या १२ स्थानकांच्या सुशोभीकरणाच्या कामांचा आज प्रारंभ होणार

यामध्ये कोकण रेल्वेमार्गावरील रायगड जिल्ह्यातील ३, रत्नागिरी जिल्ह्यातील ५ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ आणि सावंतवाडी या ४ स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे.

‘वेश्या’ हा व्यवसाय नसून स्त्रियांना नाडणारी संघटित गुन्हेगारी ! – अरुण पांडे, ‘अर्ज’ संस्था

डॉ. रूपेश पाटकर यांच्या ‘अर्जमधील दिवस’ या वेश्या वस्तीतील प्रत्यक्ष कामाविषयीच्या अनुभवांवरील पुस्तकाला या वर्षीचा ‘सरस्वती लक्ष्मण पवार पुरस्कार’ घोषित झाला. या पुरस्काराचे वितरण सावंतवाडी शहरातील श्रीराम वाचन मंदिरात झाले.

सिंधुदुर्ग : ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यानंतर कालावल खाडीत वाळूचे अवैध उत्खनन करणार्‍यांवर कारवाई !

पोलीस आणि महसूल विभाग यांनी ही कृती आधीच का केली नाही ? ग्रामस्थांच्या मागणीवर कृती करणारे नको, तर अवैध गोष्टी स्वत:हून थांबवणारे पोलीस प्रशासन हवे !

सिंधुदुर्ग : वीजवितरण आस्थापनाच्या विरोधात माडखोलवासियांचे प्रतिकात्मक ‘तिरडी’ आंदोलन !

प्रशासनाला केवळ आंदोलनाचीच भाषा समजते का ?  

देवगड (सिंधुदुर्ग) : कुवळे आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामात भ्रष्टाचार !

ग्रामस्थांना उपोषण करण्यास भाग पाडणारे प्रशासन !

नांदगाव (सिंधुदुर्ग) रेल्वेस्थानकावर ‘तुतारी एक्सप्रेस’ थांबणार

‘कोकण रेल्वे मार्गावरील कणकवली तालुक्यातील नांदगाव रेल्वेस्थानकावर ‘तुतारी एक्सप्रेस’ या गाडीला थांबा मिळावा’, अशी मागणी मंत्री राणे यांनी केली. या मागणीनुसार रेल्वेमंत्री वैष्णव यांनी ही गाडी नांदगाव येथे थांबवण्याची अनुमती दिली.

वेंगुर्ला (सिंधुदुर्ग – महाराष्ट्र) येथे पाकिस्तानी नागरिकाच्या नावे ८५ गुंठे भूमी

सध्या या भूमीवर आंबा आणि काजू कलमांची लागवड आहे. शासनाने या झाडांचा लिलाव केला असून या भूमीच्या भोवती तारेचे कुंपण घालण्याची प्रक्रिया चालू केली आहे. शासनाने ही भूमी कह्यात घेतल्यानंतर ७/१२ वर भारत शासनाचे नाव आले आहे.

सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्यातील हत्तींच्या उपद्रवामुळे संतप्त शेतकरी १० ऑगस्टला आंदोलन करणार !

शासनाने यावर उपाययोजना करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीद्वारे त्याचे दृश्य परिणाम अद्याप दिसत नसून हत्तींकडून हानी करणे चालूच आहे. हत्तींचा उपद्रव थांबवू न शकणारे प्रशासन जनतेच्या सहनशीलतेचा अंत पहात आहे का ?

सिंधुदुर्ग-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक चालू 

कोल्हापूर जिल्ह्यातील बालिंगा येथील पूल अतीवृष्टीमुळे बंद करण्यात आला होता; मात्र आता हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने वाहतूक पूर्ववत् चालू करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग : ‘ऑनलाईन’ अर्जातील चुकांमुळे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभापासून अनेक लाभार्थी वंचित ! 

शासकीय यंत्रणेच्या चुकांमुळे अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित रहाणार आहेत. त्यामुळे अशा लाभार्थ्यांची ‘ऑनलाईन पोर्टल’वरील माहिती वेळीच अद्ययावत करावी, अन्यथा ते लाभार्थी कायमस्वरूपी अपात्र ठरले जाऊ शकतात.