१. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या दृष्टीतून गौरवास्पद भारतभूमी
‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदुत्वाची कास धरली आणि सशस्त्र क्रांतीच्या साहाय्याने हिंदुस्थानला ब्रिटीश साम्राज्याच्या दास्यत्वातून मुक्त केले. त्यांनी या भारतभूमीला मातृभूमी, पितृभूमी आणि पुण्यभूमी म्हणून संबोधले अन् सन्मानित केले. तिच्याविषयी त्यांच्या मनात असलेली नितांत आदराची, श्रद्धेची आणि अभिमानाची भावना आपल्या कृतीतून, वाणीतून अन् लेखणीतून सातत्याने व्यक्त केली. ही भारतभूमी ऋषिमुनी आणि साधूसंत पुरुष यांची कर्मभूमी म्हणून त्यांना अत्यंत प्रिय होती. तिच्यासाठी ते सर्वस्व अर्पण करण्यास सिद्ध झाले. या आपल्या मातृभूमीविषयी सावरकर लिहितात, ‘होय, सिंधूपासून समुद्रापर्यंत पसरलेली ही भारतभूमी, हा हिंदुस्थान आमची पुण्यभूमीच आहे; कारण आमच्या धर्मसंस्थापकांना, द्रष्ट्या ऋषींना, म्हणजेच वैदिक ऋषिमुनींपासून दयानंद सरस्वती यांच्यापर्यंत जैनमुनींपासून महावीरापर्यंत, बुद्ध भगवानांपासून बसवेश्वरापर्यंत, चक्रधरापासून चैतन्यापर्यंत आणि रामदासांपासून राममोहनापर्यंतच्या आमच्या सर्व गुरूंना अन् सत्पुरुषांना या भूमीने जन्म दिला आणि त्यांना आपल्या अंगावर वाढवले. हिच्या मार्गावर विखुरलेल्या प्रत्येक धूलिकणातून आमच्या माहात्मांच्या आणि आमच्या वंद्य गुरूंच्या पदाघाताचे निनाद आमच्या कानात आजही उमटत असतात. येथील नद्या परमपवित्र आहेत. नद्यांच्या काठची उद्याने, उपवने तशीच निर्मळ आणि पवित्र आहेत; कारण चांदण्या रात्री अधिकच रम्य झालेल्या याच नद्यांच्या घाटांवर किंवा उद्यानांतून अन् उपवनांतून वृक्षांच्या सायंकाळच्या दीर्घ बनलेल्या छायेखाली बसून एखाद्या बुद्धाने किंवा एखाद्या शंकराचार्याने जीवित, जीव, जगदीश, आत्मा, मानव, ब्रह्म आणि माया यांसारख्या गहन तत्त्वांचा ऊहापोह केला अन् चर्चा केली असेल. होय ! येथे दिसणारी प्रत्येक टेकडी आणि प्रत्येक दरी किंवा गुहा एखादे कपिल किंवा एखादे व्यास, एखादे शंकराचार्य किंवा एखादे रामदास यांची स्मृती आपल्या डोळ्यांपुढे जशीच्या तशी उभी रहाते. येथे भगीरथाने राज्य केले, ते कुरुक्षेत्र येथे आहे. रामचंद्राने आपल्या वनवासातील पहिला विराम येथे केला. तेथे सुवर्णमृग जानकीच्या दृष्टीला पडला आणि तो मारून आणण्याचा लडिवाळ हट्ट आपल्या आर्यपुत्रापाशी धरला. या ठिकाणी गोकुळाच्या त्या दिव्य गुराख्याने बासरी वाजवली आणि गोकुळातील प्रत्येक हृदय मोहिनीने मोहित केल्याप्रमाणे त्या बासरीच्या तालावर नाचू लागले.’
या ठिकाणी तो बोधीवृक्ष आहे, येथे हे मृगोद्यान आहे. या ठिकाणी महावीर निर्वाणास गेले. या ठिकाणी भक्तगणांच्या मेळाव्यात बसून गुरुनानकांनी त्यांची ‘गगन थाल रविचंद दीपक बने’, ही आरती गायली. या ठिकाणी गोपीचंदाने जोगीपणाची दीक्षा घेतली आणि हातात भिक्षा पात्र घेऊन मूठभर भिक्षेसाठी तो आपल्या बहिणीच्या दारापुढे ‘अल्लख’ म्हणून उभा राहिला. याच ठिकाणी बंदा बहादुराच्या मुलाला त्याच्या पित्याच्या डोळ्यांदेखत तुकडे करून ठार मारण्यात आले आणि रक्ताने लिडबिडलेले ते त्या मुलाचे काळीज हिंदु म्हणून मरण पत्करणाच्या अपराधावरून त्याच्या पित्याच्या तोंडात बळाने कोंबण्यात आले. हे मातृभूमी, तुझी तसू न तसू भूमी ही हौतात्म्याने पावन झालेली आहे. केवळ कृष्णसार जातीचे मृग येथे सापडतात. एवढेच नाही, तर काश्मीरपासून सिंहलद्वीपापर्यंत (तमिळनाडूपर्यंत) ज्ञानयज्ञाने किंवा आत्मयज्ञाने पवित्र झालेली अशी ही खरोखरच यज्ञभूमी आहे आणि म्हणून संतांपासून साधूपर्यंतच्या सर्व हिंदूंना ही भारतभूमी, हे सिंधुस्थान आपली पितृभू आणि पुण्यभू दोन्ही होऊन राहिली आहे. अशी ही आपली मातृभूमी परमेश्वराची अत्यंत लाडकी कन्या आहे.’
२. भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर !
जगातील विविध देशांशी तुलना करता भारतीय संस्कृती ही अत्यंत प्राचीन आहे. याविषयी सावरकर लिहितात, ‘शेक्सपियर हा दोघांचाही असल्यामुळे इंग्रजांना आणि अमेरिकनांना आपण भाऊ-भाऊ आहोत, असे वाटते; पण केवळ कालिदास किंवा भासच नव्हे, तर हे हिंदु बांधवहो, रामायण आणि महाभारत इतकेच काय वेदही तुमच्या सार्यांचे आहेत. अमेरिकेतील मुलाला जे एक राष्ट्र्रगीत शिकवले जाते, त्यात अमेरिकी राष्ट्राच्या मागे पुर्या २ शतकांचा इतिहास उभा आहे. ते यापुढे ‘यावत्चंद्रदिवाकरौ’ अशाच महत्त्व वैभवाने तळपत रहाणार, अशा प्रकारचे भावनादीपक वर्णन असते; परंतु हिंदू हा त्याचा इतिहास शतकांनी नव्हे, तर युगे आणि कल्पना यांनी मोजतो.
हिंदुस्थानच्या भूमीत पराक्रमी, अवतारी पुरुषांची आणि त्यांच्या भक्तपूजकांची एक अखंड परंपरा निर्माण झाली आहे. ज्या राष्ट्राने शत्रूशी लढून त्यांची रग जिरवल्याची विजयी जाणीव अद्याप आहे की, ज्या शत्रूने आपल्या शक्तीने ग्रीस आणि रोम, परोहा आणि इनकस या लोकांना अन् राष्ट्रांना पार नामशेष करून टाकले. त्या राष्ट्राच्या इतिहासातच पृथ्वीवरील दुसर्या कोणत्याही राष्ट्राच्या इतिहासापेक्षा त्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी अधिक निश्चितपणे देऊन ठेवलेली आपल्याला सापडते. अशा मातृभूमीविषयी असलेले प्रेम श्रेष्ठ वाटत असले, तरीही आम्हा हिंदूंना या पुण्यभूमीचे प्रेमच अधिक श्रेष्ठ वाटते.’
याचा अर्थ सावरकर यांना भारतभूमीमध्ये जन्माला आलेले ऋषिमुनी, संत, ज्ञानी, वैज्ञानिक, साहित्यिक, वीर पुरुष अशा अनेक महापुरुषांची परंपरा अधिक प्रिय आहे आणि ती परंपरा टिकवण्याचे दायित्व या मायभूमीचे पुत्र म्हणून आपल्यावर आहे, याची जाणीव सावरकर यांना आहे. ही जाणीवच या देशातील जनतेला स्फूर्ती देत असते. प्रत्येकाच्या अंतःकरणात अशा प्रकारची आपल्या मातृभूमी, पितृभूमी आणि पुण्यभूमी यांविषयीची आदराची, श्रद्धेची आणि अभिमानाची भावना देशातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या अंतःकरणात सदैव जागृत ठेवली पाहिजे, अशी अपेक्षा सावरकर बाळगतात. केवळ एवढे सांगून सावरकर गप्प बसले नाहीत, तर त्यांना संघटित करून आपल्या पुण्यभूमीसाठी कार्यरत होण्यास प्रवृत्त करतात. तिच्या रक्षणार्थ संघर्ष करण्यासाठी लागणारी प्रतिकारशक्ती निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.
३. मुसलमान भारतासाठी सर्वाधिक धोकादायक असल्याचे ओळखणारे द्रष्टे सावरकर !
काळाच्या ओघात आपल्या समाजात निर्माण झालेले दोष दूर करण्यासाठी सावरकर पुढे सरसावले. हिंदु समाजाला सामाजिक स्तरावरील ज्या ७ बेड्यांनी जखडले होते, त्या बेड्या सावरकर यांनी तोडल्या. त्यासाठी अस्पृश्यता निवारण चळवळ उभी केली. राष्ट्राच्या हितासाठी लोकप्रिय होण्याऐवजी अप्रिय होण्याचा धोका सावरकर यांनी पत्करला. राष्ट्राच्या हितासाठी यादवीलाही सामोरे जाण्यासाठी सावरकर सिद्ध झाले.
‘आपल्या देशाला सर्वाधिक धोका मुसलमान समाजाचा आहे’, हे सावरकर यांनी वेळीच ओळखले होते. गांधी आणि नेहरू यांनी हिंदु-मुसलमान ऐक्याचा खुळचट आग्रह धरला होता. त्याला सावरकर यांनी जोरदार प्रतिकार केला. मुसलमानांची मानसिकता सावरकर यांनी नेमकेपणाने जाणली होती. मुसलमानांच्या मानसिकतेविषयी सावरकर म्हणतात, ‘मुसलमान अल्पसंख्य असतांनाही त्यांनी हिंदी सैन्यात आणि सशस्त्र पोलिसांत शेकडा ६० जागा मिळवल्या. त्यामुळे त्यांचा तो वर्चस्वाचा घटक त्यांच्या आधीच प्रत्ययाला आला आहे. या सर्व गोष्टी अनुकूल अशाच असल्याचे जाणून किंवा अजाणताही त्यांचा असा पूर्ण विश्वास आहे की, एखाद्या मोठ्या जागतिक युद्धात ब्रिटिशांचा पराभव झाला, तर हिंदुस्थानच्या सीमेवर असलेल्या अहिंदी मुसलमानी राष्ट्रांच्या साहाय्याने मुसलमान हेच कदाचित् ब्रिटिशांच्या हातून हिंदुस्थानची सार्वभौम सत्ता हिसकावून घेतील आणि तेथे पुन्हा मुसलमानी साम्राज्य प्रस्थापित करतील. मग तेव्हाच त्यांना मुसलमानी भूमी किंवा स्वदेश म्हणून हिंदुस्थानवर प्रेम करता येईल आणि ते करतील. ते ‘भारत हमारा देश है किंवा हिंदुस्थान हमारा’, अशी गाणी मनापासून गातील; परंतु तोपर्यंत मुसलमान खर्या अतिरेकी धर्मनिष्ठ मुसलमानाला हा देश केवळ शत्रूभूमी असणार आहे.’
हा धोका ओळखूनच सावरकर यांनी दुसर्या महायुद्धाला आरंभ होण्यापूर्वीच देशातील हिंदु तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी प्रवृत्त केले. त्यामुळे हिंदुस्थानच्या सैन्यदलात हिंदूंची संख्या वाढली. यथावकाश याच सैन्यबळाच्या जोरावर देश स्वतंत्र करता आला. सावरकर यांनी सशस्त्र क्रांतीची शपथ घेतली आणि त्या शपथेला अनुसरून त्यांनी आयुष्यभर कार्य केले. हे कार्य करतांना त्यांना जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागली आणि अनंत शारीरिक यातनांना सामोरे जावे लागले; पण ते आपल्या शपथेपासून दूर गेले नाहीत; कारण त्यांची भावना अशी आहे की, हिंदुस्थानच्या भूमीत जन्माला येणे, ही अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे. त्याहीपेक्षा अधिक दुर्लभ असलेली गोष्ट, म्हणजे माणूस म्हणून जन्माला येणे. आपण सारे भाग्यवान आहोत की, आपला माणूस म्हणून या हिंदुस्थानच्या भूमीत जन्म झाला. अशा प्रकारे सावरकर त्यांच्या बांधवांमध्ये राष्ट्रीय भावना जागवतात आणि त्यांना संघटित करण्यासाठी जिवाचा आटापिटा करतात.
४. सावरकरांच्या आचार विचारांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित करणारी सनातन संस्था !
सावरकर यांच्या आचार विचारांचा हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित झाला पाहिजे, अशा जाणिवेने प्रेरित होऊन सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी सनातन संस्था स्थापन केली.
सावरकर यांचे विचार अनेकांच्या मनमस्तिष्कावर शिलालेखाप्रमाणे कोरले गेले आहेत. या मागचे कारण असे की, सावरकर यांच्या विचारधारेला श्रीराम, श्रीकृष्ण, आर्य चाणक्य, छत्रपती शिवराय अशा अनेकानेक शूरवीर, ज्ञानीजन, समर्थ रामदासस्वामी आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांसारख्या लोकोत्तर संतांचा वारसा लाभला आहे. त्यामुळेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे सावरकर यांच्या जीवन चरित्राकडे आकर्षित झाले.
‘राष्ट्रकार्य, समाजकार्य, धर्मकार्य आणि संस्कृतीकार्य करायचे असेल, तर सावरकरांचा वारसा आपल्याला जतन केला पाहिजे’, असे विचार त्यांच्या मनात घोळू घालू लागले. त्याला दिशा आणि आकार देण्याचे कार्य त्यांच्या गुरूंनी केले. वरील सर्व कार्य करतांना अनेक प्रकारची संकटे अन् अनेक प्रकारचे अडथळे येणार, हे गृहीत धरावे लागते. त्या अडथळ्यांना, त्या संकटांना घाबरून जायचे नाही आणि डगमगायचे नाही. येईल त्या प्रसंगाला धीरोदात्तपणे तोंड देऊन आपल्या ध्येयाकडे झेप घेण्याची सावरकर यांची वृत्ती सनातन संस्थेच्या अंगी बाणवण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला.
५. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याप्रमाणे हिंदूंच्या भावभावनांशी एकरूप झालेली सनातन संस्था !
सावरकर यांनी जशी पराभूत मानसिकता समूळ नष्ट केली, त्याप्रमाणेच पराभूत मानसिकतेला सनातन संस्थेत स्थान नाही, हे सिद्ध झाले आहे. याचे उत्तम उदाहरण, म्हणजे सनातन संस्थेवर विविध प्रकारचे आरोप करून सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा दबाव निर्माण करण्यात आला. सनातन संस्थेच्या साधकांना त्यांनी न केलेल्या अपराधासाठी दोषी ठरवण्यात आले, त्यांच्यावर हत्येचे आरोप झाले, तसेच साधकांना कारावासही भोगावा लागला; पण ते डगमगले नाहीत. त्यांनी शांतपणे निर्बंधांच्या चौकटीत राहून लढा दिला आणि स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध केले. त्यांनी त्यांचे तत्त्व आणि ध्येय यांना मुरड घातली नाही कि हाती घेतलेले कार्यही थंडावले नाही. सावरकर यांचा असा वारसा जतन करणारी सनातन संस्था ताठ मानेने सर्वत्र वावरत आहे. सनातन संस्थेचा हा विजय केवळ त्या संस्थेचा नसून हिंदु समाजाचा विजय आहे, हे सांगण्याची आवश्यकता नाही; कारण जसे सावरकर हिंदूंच्या भावभावनांशी एकरूप झाले होते, तशी सनातन संस्था हिंदु समाजाच्या भावभावनांशी एकरूप झालेली आहे.
६. राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी सनातन संस्थेकडून सनदशीर मार्गाचा अवलंब
सशस्त्र क्रांतीच्या मार्गावरून वाटचाल करत असतांना अनेक वेळा न्यायव्यवस्थेशी संबंध येणार, अटक होणार आणि विविध प्रकारचे आरोप केले जाणार, याची कल्पना सावरकर यांना होती. त्यामुळेच सावरकर यांनी स्वतः कायद्याची पदवी संपादन केली होती. सावरकर यांच्या मार्गावरून वाटचाल करतांना आपल्यावरही अशाच प्रकारची वेळ येऊ शकते, हे लक्षात घेऊन सनातन संस्थेने स्वतःची विधी तज्ञांची फौज उभी केली.
सावरकर यांनी निर्बंधाचे उल्लंघन केले नाही. अन्यायाला विरोध करणे, हा निर्बंधाने दिलेला अधिकार आहे. त्या अधिकाराचा मुक्तपणे उपयोग सावरकर यांनी केला. सनातन संस्थेने घटनात्मक मार्गाने लढा दिला. कोणत्याही निर्बंधाचे उल्लंघन केले नाही. नैतिकतेला, न्यायाला आणि सत्याला बाधा उत्पन्न होणार नाही, हे लक्षात घेऊन राष्ट्र्रकार्य, धर्मकार्य आणि संस्कृतीकार्य उत्तम प्रकारे करता येते, असा विश्वास सनातन संस्थेने हिंदु समाजात निर्माण केला. देश स्वतंत्र झाल्यावर सावरकर म्हणाले, ‘आता बुलेटची (बंदुकीच्या गोळीची) आवश्यकता नाही. आज आपल्याला जे राष्ट्र्रहित आणि समाजहित यांच्या दृष्टीने अपेक्षित आहे, ते मतपेटीच्या माध्यमातून प्राप्त करू शकतो.’ याचाच अर्थ निर्बंधांच्या चौकटीत राहून आपण राष्ट्र्रहितासाठी संघर्ष करू शकतो, असा आहे. आज सनातन संस्था त्याच मार्गाने वाटचाल करतांना आढळते.
७. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वसंरक्षणाविषयीच्या विचाराची सनातन संस्थेकडून कार्यवाही !
देशातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था अबाधित रहावी आणि प्रसंग पडल्यास जनतेला बाहेरील किंवा अंतर्गत शत्रूच्या विरोधात शिस्तबद्धतेने प्रशिक्षित होऊन पराभूत करता यावे आणि लढता यावे, यांसाठी सैनिकी शिक्षण अनिवार्य करावे, अशी मागणी सावरकर यांनी केली होती; पण त्यांच्या या विचाराकडे आणि मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. सनातन संस्थेने मात्र स्वसंरक्षणाच्या दृष्टीकोनातून हिंदु बांधवांमध्ये लढाऊ वृत्ती निर्माण केली.
८. सनातन संस्थेच्या साधकांची सतर्कता
मुसलमानांचे संख्याबळ वाढताच त्यांनी राष्ट्रघातकी आणि मानवतेला कलंक ठरतील, अशा प्रकारचे जघन्य अपराध केले. लव्ह जिहाद, हलाल जिहाद आणि भूमी जिहाद इत्यादींच्या विरोधात जनजागृती करून निर्बंधांच्या मर्यादेत राहून सनातन संस्थेने आंदोलने केली, तसेच सरकारकडे गार्हाणे करून राष्ट्रघातकी कृत्याला आळा घालण्याचा प्रयत्न केला. सावरकर यांनी ‘मुसलमानांची मानसिकता जाणून ते कधीही राष्ट्राशी एकनिष्ठ रहाणार नाहीत’, असे सांगितले होते. सावरकरांची ही शिकवण लक्षात ठेवून सनातन संस्थेचे सर्व साधक डोळ्यात तेल घालून देशात वावरत आहेत.
९. सनातन संस्थेकडून हिंदूंना संघटित करण्याचे प्रयत्न
सावरकर यांनी संपूर्ण हिंदु समाजाला संघटित करण्याचा प्रयत्न केला, तसा प्रयत्न सनातन संस्था सातत्याने करत आहे. त्यासाठी सनातन संस्था ही हिंदु जनजागृती समिती आयोजित करत असलेल्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात सहभाग घेते. या अधिवेशनाच्या माध्यमातून देशातील विविध भागांतील अडीअडचणी आणि संकटे यांच्याविषयी माहिती देण्याचा अन् ती माहिती संकलित करण्याचा शिस्तबद्ध उपक्रम राबवला जात आहे. या अधिवेशनाला देशातील अधिवक्ते, विचारवंत, साधुसंत, अभ्यासक, आंदोलक, निवृत्त प्रशासकीय अधिकारी, माजी सैनिकी अधिकारी या आणि अशा सर्वांचा सहभाग असतो. हे अधिवेशन हिंदूंना संघटित करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. देशातील विविध हिंदु संघटनांना एकत्रित करून हिंदूंचे संख्याबळ संघटित करण्याचा आवश्यक असलेला प्रयत्न सनातन संस्थेकडून चालू आहे.
१०. सनातन पुरोहित पाठशाळेची स्थापना
सावरकर यांनी सांगितलेल्या मार्गदर्शक तत्त्वावर कार्य करण्यासाठी सनातन संस्थेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. पुण्याच्या नारद मंदिरात ‘वेदामृत सर्वांना पिऊ द्या’, असा विचार व्यक्त करून वेदविद्येचा गौरव करतांना सावरकर म्हणाले, ‘वेदमंत्रात जे ओज आहे, जो गंभीर अर्थ आहे, तो कळला, तर वेदविद्या जिवंत ठेवायची कि नाही, हा प्रश्नच येणार नाही. वेदविद्या गेली, तर हिंदुत्व गेले. वेदविद्या संसाराच्या सर्व गोष्टींचे मूळ आहे. वटवृक्षाचे बीज लहान असले, तरी वृक्ष प्रचंड असतो, त्याप्रमाणे वेदांत औद्योगिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक थोडक्यात, म्हणजे संपूर्ण जैविक तत्त्वज्ञान आहे. वेदांमधील मंत्र हे राष्ट्र्रगीत आहेत, ते आर्यांचे पहिले राष्ट्रगीत आहे. लाखो वर्षांपूर्वी उषःकाली ते रचले गेले. त्यावरच राष्ट्राची उभारणी झाली.’
सावरकर यांच्या या विचारांचा आधार घेऊन सनातन संस्थेने सनातन पुरोहित पाठशाळा चालू केली. त्या पाठशाळेत तरुणांना वेदांचे शास्त्रोक्त शिक्षण दिले जाते. हे वेदवाङ्मय ही वेदविद्या हिंदूंची खरी ओळख आहे. ती ओळख टिकवण्यासाठीच सनातन संस्था कृतीशील झाली आहे.
११. जातीपातीच्या पलीकडे जाऊन अखिल मानवजातीला साधना शिकवणारी सनातन संस्था !
सावरकर यांनी जातीपातीच्या पलीकडचे विचार प्रत्यक्ष आचरणात आणले. पतितपावन मंदिराची स्थापना करून त्यांनी हिंदु धर्मातील सर्व जातीतील लोकांना ते मंदिर उपलब्ध करून दिले. ‘मंदिरातील देवीदेवतांची पूजा शास्त्रोक्त पद्धतीने झाली पाहिजे’, असा आग्रह धरला. सनातन संस्थेने सावरकर यांचा हा आदर्श समोर ठेवून तोच मार्ग आचरला आहे. एवढेच नाही, तर विदेशातील अनेक अहिंदूंना आपल्या आश्रमामध्ये सामावून घेतले आहे. त्यांच्या अंतःकरणात हिंदुत्वाचे बीज पेरले आहे.
‘आयरिश सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखक शिक्षिका असलेल्या मार्गारेट एलिझाबेथ नोबल, म्हणजेच भगिनी निवेदिता यांच्याप्रमाणे हिंदु धर्माशी आणि हिंदु संस्कृतीशी, तसेच हिंदूंच्या ऐतिहासिक परंपरेशी आपली नाळ जोडून हिंदुत्वाचा स्वीकार करण्यास सिद्ध असेल, तर अशा लोकांना अवश्य आपल्या सहवासात आणून हिंदु करून घ्यावे अन् त्यांच्याकडून हिंदुत्वाचे कार्य करून घ्यावे’, अशी इच्छा सावरकर यांनी व्यक्त केली होती. त्या इच्छेला अनुसरून सनातन संस्था कार्यरत आहे. सनातन संस्थेच्या आश्रमात असणारे विदेशी वंशाचे साधक त्याची साक्ष देतात.
१२. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विज्ञानदृष्टीचा वारसा सनातन संस्थेकडे !
सावरकर यांची विज्ञानदृष्टीही सनातन संस्थेने त्यांचा वारसा हक्क म्हणून जोपासली आहे. हिंदूंच्या अध्यात्मशास्त्राला विज्ञानाचे पाठबळ कसे लाभले आहे, हे सनातन संस्था शास्त्रीय दृष्टीकोन ठेवून विशद करण्याएवढी सक्षम झाली आहे. जगात आढळणारा कोणताही चमत्कार, म्हणजे विज्ञानाला पडलेले कोडे आहे, असे समजून विज्ञानाने ते कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणताही चमत्कार अंधश्रद्धा म्हणून फेटाळता येत नाही किंवा असत्य ठरवता येत नाही. असे जर कुणी म्हणत असेल, तर त्याला वैज्ञानिक दृष्टी आहे, असे म्हणता येणार नाही, असे सावरकर सांगतात. सावरकर यांच्या या विचारांशी एकनिष्ठ राहून सनातन संस्थेने अध्यात्मशास्त्र हे विज्ञानच्या कसोटीला पूर्णपणे उतरते, हे विविध प्रयोगांद्वारे दाखवून दिले आहे. असा विश्वास आधुनिक पिढीला देण्याचे मोठे कार्य सनातन संस्था करत आहे.
१३. सावरकरांच्या पत्रकारितेचा वारसा पुढे चालवणारे ‘सनातन प्रभात’ !
विविध प्रकारच्या कार्यासाठी सनातन संस्थेने त्या त्या विषयाला अनुरूप असे प्रसारकार्य चालू केले आहेत. सावरकर यांनी त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संपूर्ण हिंदु समाजाला संघटित करण्यासाठी हिंदु समाजासमोर असलेले धोके आणि संकटे कोणती, ते सांगण्यासाठी लेखणीचा उपयोग केला. त्यासाठी विविध वृत्तपत्रे, साप्ताहिके आणि नियतकालिके यांमधून सातत्याने लेख लिहित राहिले. सावरकर यांचा हा पत्रकारितेचा वारसाही सनातन संस्थेने आपला वारसा म्हणून जतन केला आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’ त्याची साक्ष देत आहे.
अशा प्रकारे सनातन संस्था आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अन्योन्य संबंध आहे. त्यांच्या पदपथावरून वाटचाल करत हिंदूसंघटन करत ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्र्रम्’, असा हिंदुत्वाचा जयघोष करणारी सनातन संस्था आज ‘देशातील एक अग्रगण्य संस्था’ म्हणून मान्यता पावली आहे.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (१४.११.२०२४)