सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार सहस्रो जिज्ञासू प्रतिदिन साधना करत आहेत. ‘सनातन सांगत असलेल्या ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गामुळे गेल्या २५ वर्षांत १२७ साधक संतपदाला पोचले आहेत आणि सहस्रो साधक त्या दिशेने वाटचाल करत आहेत. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे, साधनेमुळे त्यांची सूक्ष्म ज्ञानेंद्रिये आणि सूक्ष्म कर्मेंद्रिये कार्यरत झालेली आहेत. त्यामुळे सनातनच्या संतांना सूक्ष्मातील चांगल्या प्रकारे कळते आणि संतपदाकडे वाटचाल करणार्या साधकांना आता सूक्ष्मातील थोडेफार कळू लागले आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |