जातीयवादी शक्ती परिस्थितीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत ! – शरद पवार

‘‘ज्यांना सत्ता मिळाली, त्यांनी या सत्तेचा अपवापर कसा केला, हे जनतेने पाहिले आहे. सत्ता मिळत नसल्याने नैराश्यातून भाजप महाविकास आघाडीवर आरोप करत आहे. त्याला फार महत्त्व देण्याची आवश्यकता नाही.

मालेगाव येथील हिंसाचाराच्या प्रकरणी पोलिसांची रझा अकादमीच्या कार्यालयावर धाड !

विविध दस्तऐवज आणि कागदपत्रे जप्त !
हिंसाचारप्रकरणी अटक केलेल्यांची संख्या ४१ वर !

हिंदुत्वाची तुलना आतंकवादाशी करणारे काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’ या पुस्तकावर बंदी घाला !

‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’ या पुस्तकावर तसेच राज्यात अराजकाची स्थिती निर्माण करणार्‍या रझा अकादमीवर बंदी घाला.

आजी-माजी नगरसेवकांनी मालेगाव पेटवल्याच्या संशयाप्रकरणी आतापर्यंत ३३ जणांना अटक !

त्रिपुरा येथील कथित घटनेवरून मालेगाव येथील हिंसाचार प्रकरणात आजी-माजी नगरसेवकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यांनीच हे प्रकरण पेटवल्याचा संशय असून आतापर्यंत ३३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

नवाब मलिक यांनी आरोप सिद्ध न केल्यास दावा ठोकणार ! – अनिल बोंडे

मलिक यांच्या या आरोपानंतर भाजपचे नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी म्हटले की, नवाब मलिक यांनी आरोप सिद्ध करून न दाखवल्यास त्यांच्यावर येथील न्यायालयात अब्रूहानीचा दावा प्रविष्ट करण्यात येईल.

मालेगावची घटना म्हणजे देशात अराजक निर्माण करण्यासाठी विचारपूर्वक केलेला प्रयोग ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

. . . हे षड्यंत्र उघड होऊ नये, यासाठी नवाब मलिक यांनी हे प्रकरण भाजपवर ढकलले. या घटनेला महाविकास आघाडीचा पाठिंबा होता, असे आरोप फडणवीस यांनी केले.

हिंदुत्वाला अपकीर्त करणारे काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांच्या हिंदुद्वेषी पुस्तकावर बंदी घाला !

हिंदुद्वेषी खुर्शिद यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचीही मागणी

राज्यपालांकडे रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी करणार ! – विहिंप

रझा अकादमी आणि इतर संघटना यांच्याविरुद्ध हिंसाचाराचे गुन्हे नोंद केले पाहिजेत. या विरोधात विश्व हिंदु परिषदेच्या वतीने तक्रारी प्रविष्ट करण्यात येणार आहेत.

दंगल भडकवणार्‍या रझा अकादमीऐवजी स्वरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार्‍या हिंदूंना दोषी ठरवण्याचा सरकारचा प्रयत्न ! – आमदार नीतेश राणे, भाजप

रझा अकादमीने काढलेला मोर्चा पूर्वनियोजित होता. हे पोलिसांच्या लक्षात का आले नाही ? राज्यात सरकारच्या पाठिंब्याने हिंदूंवर अन्याय चालू आहे का ?

‘रझा अकादमी’ची पाळेमुळे सांगली जिल्ह्यात आहेत का ? याचे अन्वेषण करा ! – नितीन शिंदे, माजी आमदार

रझा अकादमी – २ दिवसांपूर्वी अमरावती येथे झालेल्या दंगलीत ‘रझा अकादमतीचा पुढाकार होता, असे वृत्त समोर येत आहेत. त्यामुळे ‘रझा अकादमी’वर सरकारने बंदी घालण्याचे धाडस दाखवावे.