‘सरकारच्या विरोधात बोलल्याने अस्तित्वच नष्ट केले जाते !’ – राहुल गांधी

राहुल गांधी यांचे अमेरिकेत भारताची प्रतिमा मलिन करणारे वक्तव्य !

राहुल गांधी

वॉशिंग्टन – भारतात सरकारच्या विरोधात बोलल्यास अस्तित्वच नष्ट केले जाते, असे भारतविरोधी वक्तव्य काँग्रेसचे नेते  राहुल गांधी यांनी केले. ते अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापिठातील एका कार्यक्रमात बोलत होते. गांधी यांचे संसद सदस्यत्व रहित झाल्यानंतर ते प्रथमच विदेश दौर्‍यावर गेले आहेत. ते पुढे म्हणाले, ‘‘अवमानाच्या प्रकरणात लोकसभेचे सदस्यत्व गमावणारा मी पहिला व्यक्ती असेन, असे मला कधीच वाटले नव्हते; पण राजकीयदृष्ट्या मला मोठी संधी मिळाली आहे. कदाचित् संसदेत बसण्याच्या संधीपेक्षाही ती मोठी आहे. राजकारण अशाच पद्धतीने चालते. भारतात विरोधक संघर्ष करत आहेत. विरोधकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. केवळ काँग्रेसलाच लक्ष्य केले जात आहे असे नाही, तर हुकूमशाहीमुळे सर्वच विरोधी पक्ष त्रस्त आहेत. जो कुणी सरकारच्या विरोधात बोलतो, त्याच्या संस्था कह्यात घेतल्या जातात किंवा त्यांचेही अस्तित्व नष्ट केले जाते.

संपादकीय भूमिका 

विदेशात जाणूनबुजून भारताची प्रतिमा मलिन करणार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !