‘संगम टॉक्स’ च्या माध्यमातून आम्ही हिंदु धर्मावरील आघातांना वाचा फोडत आहोत ! – श्रीमती तान्या मनचंदा, संपादक, संगम टॉक्स

( संग्रहीत छायाचित्र )

रामनाथी, २१ जून (वार्ता.) – आमच्या पिढीला विशेषतः शहरी युवकांना धर्मशिक्षण दिले गेले नाही, हे आमचे दुर्भाग्य आहे; परंतु ‘संगम टॉक्स’ या यू-ट्युब वाहिनीच्या (‘चॅनेल’च्या) माध्यमातून युवकांना आम्ही हिंदुत्वाविषयी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहोत. आम्ही या माध्यमातून युवकांना हिंदु धर्मकार्याकडे आकर्षित करत आहोत. लव्ह जिहाद आणि हिंदी चित्रपटसृष्टी यांचे खरे स्वरूप आम्ही उघड केले.

( संग्रहीत छायाचित्र )

ख्रिस्त्यांच्या हिंदु धर्मविरोधी कारवाया आम्ही ‘संगम टॉक्स’च्या माध्यमातून उघड केल्या. कलियुगातूनच सत्ययुगाची निर्मिती होणार आहे; मात्र त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त होण्यासाठी आम्ही जागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले. शीख हिंदूंपासून वेगळे असल्याचे ‘नॅरेटिव्ह’ (कथानक) निर्माण केले जात आहे. याचे स्वरूपही आम्ही चॅनलद्वारे उघड केले.

श्रीमती तान्या मनचंदा, संपादक, संगम टॉक्स

‘संगम टॉक्स’ च्या माध्यमातून हिंदूंना दिशादर्शन केले जात आहे. असे भावपूर्ण उद्गार संगम टॉक्सच्या संपादक श्रीमती तान्या मनचंदा यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या ६ व्या दिवशी (२१.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होत्या.