विद्यालयांतून इस्लामीकरण !

येथे मौलानांनी विद्यार्थ्यांना इस्लाममधील शब्दांचे अर्थ आणि नमाजपठणाचे महत्त्व यांची माहितीही सांगितली. एवढ्यावरच न थांबता ‘तुम्ही दगडाच्या देवाला पूजता. आम्ही आकाशातील देवाला पूजतो’, अशी हिंदु धर्माशी तुलना करून विद्यार्थ्यांची दिशाभूलही केली.

राष्ट्रपती विधवा आणि आदिवासी असल्याने त्यांना संसदेच्या उद्घाटनाला न बोलावणे, हा सनातन धर्म आहे का ? – उदयनिधी स्टॅलिन

प्रत्येक गोष्टीला सनातन धर्माशी जोडण्याचा प्रयत्न करणार्‍या उदयनिधी यांना सनातन धर्मद्वेषाची काविळ झाली आहे, असेच यातून दिसून येते !

आपला व्यवसाय भरभराटीस येईल किंवा नष्ट होईल, हे आपण आपली सचोटी कशी राखतो ?, यावर अवलंबून ! – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड

आपण सर्वांना मूर्ख बनवू शकतो; पण स्वतःला नाही. आपला व्यवसाय भरभराटीस येईल किंवा नष्ट होईल, हे आपण आपली सचोटी कशी राखतो ?, यावर अवलंबून असते, असे विधान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले.  

तुष्‍टीकरणाच्‍या राजकारणामुळे मागील ७५ वर्षे तेलंगाणा मुक्‍ती दिन साजरा केला नाही ! – अमित शहा, गृहमंत्री

केंद्रीय गृहमंंत्री अमित शहा हे सिकंदराबाद येथे तेलंगाणा मुक्‍ती दिनाच्‍या निमित्ताने आयोजित केलेल्‍या कार्यक्रमामध्‍ये सहभागी झाले.

‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ या संघटनेला शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घाला ! – विश्व हिंदु परिषद, गोवा

कुराणावरील सिद्धांतानुसार चालणाऱ्या या संघटनेचा उद्देश; धार्मिक सलोखा राखणे हा नव्हे, तर अन्य धर्मीय युवावर्गाला इस्लामकडे आकर्षित करणे, हाच आहे !

गोवा : विद्यालयाच्या व्यवस्थापनावर कारवाई होण्याची शक्यता

विद्यार्थ्यांना मशिदीत नेऊन धार्मिक कृती करण्यास भाग पाडले असल्यास विद्यालयाचे केवळ प्राचार्यच नव्हे, तर व्यवस्थापनही उत्तरदायी ठरत असल्याने त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार !

गोवा : सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ३० हिंदु विद्यार्थ्यांना मशिदीत पाठवून इस्लामनुसार कृती करायला लावली !

दाबोळी येथील केशव स्मृती विद्यालयाचे असेच प्रकरण ताजे असतांनाच आता हा ही एक प्रकार ! गोवा सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करणे आवश्यक !

विद्यालयांतून इस्‍लामीकरण !

‘पी.एफ्.आय.’ आणि तिची विद्यार्थी संघटना यांवर बंदीची मागणी करण्‍यासमवेतच देशातील प्रत्‍येक शाळेमध्‍ये असे प्रकार चालले आहेत का ? याची सखोल चौकशी करण्‍याची मागणी हिंदुत्‍वनिष्‍ठांनी शासनाकडे निक्षून केली पाहिजे. पालकांनीही शाळांमध्‍ये असे होऊ नये, यासाठी दबाव आणला पाहिजे !

गोवा : हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या आंदोलनानंतर विद्यालयाचे प्राचार्य शंकर गावकर सेवेतून निलंबित

एवढा मोठा प्रकार होऊनही एकही पुरो(अधो)गामी किंवा स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारे राजकीय नेते मूग गिळून गप्प का आहेत ? त्यांना या प्रकरणाची गंभीरता लक्षात येत नाही कि मुसलमानांच्या मतांसाठी ते या प्रकराकडे दुर्लक्ष करत आहेत ! हिंदूंना शालेय जीवनापासूनच धर्मशिक्षण घेण्याची आवश्यकता या घटनेतून स्पष्ट होते !

गोवा : दाबोळी येथील केशव स्मृती विद्यालयाच्या हिंदु विद्यार्थ्यांसाठी मशीद दर्शन कार्यक्रम !

सरकारचे अनुदान घेणार्‍या शाळांना कोणत्याही धार्मिक कृतीमध्ये सहभागी होता येत नाही, असे असतांना हा उपक्रम कसा राबवण्यात येतो ? शाळा व्यवस्थापन असे कार्यक्रम राबवून काय साध्य करू इच्छिते ?