‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाला विरोध करणार्‍या जिहादींना योग्य प्रत्युत्तर देऊ ! – नितेश राणे

चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन !

भाजपचे प्रवक्ते तथा आमदार श्री. नितेश राणे

मुंबई – ‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाला केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे (‘सेन्सॉर बोर्डा’चे) प्रमाणपत्र मिळालेले नाही. या बोर्डामधील जिहादी विचारसरणी असणारा एक अधिकारी या प्रक्रियेत अडथळा आणत आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनीही मला याविषयी सांगितले आहे. अशा जिहादींना योग्य प्रत्युत्तर कसे द्यायचे, हे आम्हाला ठाऊक आहे. छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज अशा महापुरुषांवरील चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी आम्ही सर्व शक्तीनिशी प्रयत्न करू, असे प्रतिपादन भाजपचे आमदार श्री. नितेश राणे यांनी केले. ते ‘सुदर्शन मराठी’ या वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते. ‘धर्मविरांना विरोधात करणार्‍यांचा प्रतिकार कसा करायचा, ते धर्माने आम्हाला शिकवले आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा अशी अडचण येणार नाही’, असेही ते म्हणाले.