गोरक्षणाच्या कार्यात स्वतःचे जीवन समर्पित केलेले पुणे येथील गोरक्षक श्री. शिवशंकर स्वामी !

श्री. शिवशंकर स्वामी

१. शिवशंकर स्वामी यांचा परिचय

श्री. शिवशंकर स्वामी हे अंबाजोगाई (जिल्हा बीड) जवळ असलेल्या उजनी येथील आहेत. श्री. स्वामी यांनी पुण्यातील महापालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले, तर ‘स्व-रूपवर्धिनी संस्थेत स्वामी विवेकानंद शाखेचा युवक म्हणून धडे गिरवले आहेत. त्यांच्या वडिलांचा ‘ट्रॅव्हल्स’चा व्यवसाय आहे. त्यांचे बालपण १० फूट x १० फूट जागा असलेल्या घरात गेले. त्यांनी १० वीनंतर ‘आयटीआय’मध्ये (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत) प्रवेश घेतला. त्यांच्या घरातील आर्थिक स्थिती सांभाळण्यासाठी ते त्यांच्या गुरुस्थानी असलेल्या समस्त हिंदुत्ववादी आघाडीचे कार्याध्यक्ष श्री. मिलिंद एकबोटे यांच्या कार्यालयात नोकरी करू लागले.

विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्‍या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल ! – संपादक

२. कार्याचा आरंभ

एक दिवस श्री. मिलिंद एकबोटे यांचे कार्यकर्ते गायींची सुटका करण्यासाठी चाकण परिसरात निघाले असता श्री. स्वामी हेही त्यांच्यासमवेत निघाले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच चाकण बाजारात कत्तलीसाठी नेणार्‍या २९ गायींचा ट्रक पोलिसांच्या साहाय्याने  पकडला. या घटनेनंतर श्री. स्वामी यांना गोरक्षणाची आवड निर्माण झाली. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्यांनी पूर्णवेळ गोरक्षणाच्या कार्यात स्वतःला समर्पित केले. या कार्यात त्यांच्या आई-वडिलांचाही पूर्ण पाठिंबा मिळाला.

३. कार्य करतांना ओढवलेले जीवघेणे प्रसंग

अ. वर्ष २०१७ मध्ये श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्री. स्वामी यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला गेला. काष्टी येथे कत्तलीसाठी नेणारा १२ बैलांचा टेंपो स्वामी यांनी पकडला. यासंदर्भात गुन्हा नोंद करत असतांना १०० धर्मांध पोलीस ठाण्यात जमा होऊन शिवीगाळ करत धमक्या देऊ लागले. नंतर झालेल्या हाणामारीत श्री. स्वामी यांचे चार सहकारी घायाळ झाले. यातील एकाला अजूनही बोलता येत नाही. त्या वेळी कार्यकर्ते आणि पोलीस यांच्या साहाय्याने श्री. स्वामी बचावले. अनेक वेळा जिवे मारण्याचा प्रयत्न, पाकिस्तानातून जिवे मारण्याच्या धमकीचे भ्रमणभाष, अशी सर्व परिस्थिती सांभाळत श्री. स्वामी यांनी त्यांचे कार्य अधिक वेगाने चालू ठेवले.

आ. एकदा अिहल्यानगरहून पुण्याला येतांना श्री. स्वामी यांना जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जात असलेला टेंपो दिसला. धर्मांध कसायांना हे कळल्यानंतर त्यांनी श्री. स्वामी यांच्या गाडीचा पाठलाग करत त्यांच्या चालत्या गाडीवर कोयते, धारदार तलवारी, काठ्या यांनी आक्रमण केले. श्री. स्वामी हे आळेफाटा पोलीस ठाण्यात पोचल्यानंतरही आक्रमण चालूच होते. त्यानंतर आक्रमण करणार्‍यांवर गुन्हा नोंदवण्यात आला. श्री. स्वामी यांना मारण्यासाठी अहिल्यानगरमधील एका मशिदीत १ कोटी रुपये गोळा केले गेले होते.

इ. वर्ष २०१९ मध्ये महाराष्ट्रातील काही कसायांनी एकत्र येत श्री. स्वामी यांना संपवण्यासाठी ७ कोटी रुपये गोळा केले. ज्याने सुपारी घेतली, त्याने श्री. स्वामी यांच्या घराची ‘रेकी’ केल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. याआधीही श्री. स्वामी यांचे हात-पाय तोडण्यासाठी ८ लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. पेरणे फाटा, खेड शिवापूर, अहिल्यानगर, सातारा, सोलापूर, पुणे, धाराशिव, बीड, खडकत, इंदापूर, आळेफाटा यांसारख्या अनेक ठिकाणी त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला; मात्र तरीही त्यांनी माघार घेतली नाही. श्री. स्वामी यांच्या नावाने खंडणी उकळणार्‍यांनाही त्यांनी स्वतः पकडून पोलिसांच्या कह्यात दिले आहे.

सतत होणारी आक्रमणे पहाता श्री. स्वामी यांना वर्ष २०१५ नंतर २४ घंटे पोलीस संरक्षण पुरवण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दिवस-रात्र प्रत्येकी २ सशस्त्र पोलीस त्यांच्या समवेत असतात.

श्री. शिवशंकर स्वामी यांचे अतिशय प्रेरणादायी कार्य !

‘गोरक्षण आणि श्री. शिवशंकर स्वामी हे समीकरण केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातील गोरक्षकांना आदर्श असे आहे ! ३० सहस्रांहून अधिक गायींची कत्तलीपासून सुटका करण्याचे जीवावर उदार होऊन केलेले हे कार्य अतिशय प्रेरणादायी आहे ! असे हिंदुत्वाचे शिलेदार श्री. शिवशंकर स्वामी यांना हे कार्य करण्यासाठी अधिकाधिक शक्ती मिळो’, अशी धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !

४. कार्यातील यश

अ. ८०० हून अधिक कसायांवर गुन्हे नोंद करण्यासाठी पाठपुरावा आणि कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

आ. ८७ अवैध पशूवधगृहांच्या विरोधात वैध मार्गाने न्यायालयीन लढा देऊन ते उद्ध्वस्त करण्यात आले, तर ११ पशूवधगृहांना सील ठोकले.

इ. वर्ष २०१९ मध्ये पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये १ सहस्रांहून अधिक गायींची कत्तल करून ते मांस व्हिएतनाम, दुबई या देशांत पाठवले जात असल्याचे श्री. स्वामी यांना कळले. श्री. स्वामी यांनी तेथे धाड टाकल्यानंतर १२ कोटी रुपयांचे ५५ टन गोमांसासह ७५ गायींना जिवंत पकडले आणि संबंधितांवर कारवाई करण्यात आली.

ई. परदेशात गोमांस पाठवणार्‍या वाहनांना पकडून पोलिसांकडे देण्यात आले. यामध्ये पुण्यातील खडकी येथे १०० टन, हडपसर येथे २८.५ टन, बारामती येथे ५५ टन गोमांस पकडले आणि संबंधितांवर गुन्हे नोंदवण्यात आले.

उ. वर्ष २०११ मध्ये श्री. स्वामी यांना राज्यशासनाच्या वतीने ‘मानद पशूकल्याण अधिकारी’ म्हणून नियुक्त करण्यात आले. हे पद केवळ नामोल्लेख करण्यासाठी असून या पदाचे मानधन किंवा कोणते लाभ मिळत नाहीत. या पदामुळे केवळ पोलिसांच्या सहकार्याने गोवंशियांची सुटका करण्यासाठी अनुमती मिळते.

वाहनातून गोवंशियांना बाहेर काढतांना श्री. शिवशंकर स्वामी

५. विशेष उपक्रम

अ. कसायांकडून गायी स्वतःकडे घेतल्यानंतर श्री. स्वामी त्या गायींना सरकारमान्य गोशाळांमध्ये पाठवतात. गायींना केवळ कसायांच्या हातून सोडवून आणणे नव्हे, तर त्या गायींचा शेवटपर्यंत सांभाळ व्हावा, यादृष्टीने उचललेले हे पाऊल अतिशय महत्त्वाचे आहे. यातून अन्य गोरक्षकांनाही श्री. स्वामी यांचे साहाय्य होते.

गोरक्षक श्री. शिवशंकर स्वामी यांचे आवाहन !

‘गोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांनी अतिशय कोवळ्या वयात कसायाचा हात तोडून गोरक्षण केले अन् गोरक्षणाचे महत्त्व सर्व हिंदु बांधवांना दाखवून दिले. आज पोलीस आणि स्थानिक हिंदु बांधवांनी या कार्यात पुढे येण्याची आवश्यकता आहे. गायी विकतांना त्या कसायांना न विकता गोशाळेत पाठवा’, असे आवाहन गोरक्षक श्री. शिवशंकर स्वामी सातत्याने करत आहेत.

आ. घरची परिस्थिती हलाखीची असलेल्या शेतकर्‍यांना गायी पाळणे कठीण होत असल्याने, तसेच गोवंश वृद्ध झाल्यानंतर त्याचा सांभाळ करण्याची आर्थिक क्षमता नसल्याने शेतकरी हा गोवंश बहुधा कसायांना किंवा पशूवधगृहांना विकत असत. हे थांबवण्यासाठी श्री. स्वामी यांनी शेतकर्‍यांकडून मूळ किमतीच्या १ सहस्र रुपये अधिक देऊन त्यांनी आतापर्यंत २५०० हून अधिक गायी गोशाळेत पाठवल्या आहेत.