देवगड येथे गुटख्याची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी एकाला अटक

८६ सहस्र ६४० रुपये किमतीचा गुटखा आणि पानमसाला कह्यात

१ सहस्र १०० कोटी रुपयांचा घोटाळा होईपर्यंत झोपलेले पोलीस !

‘पुण्यातील भाईचंद हिराचंद रायसोनी (बी.एच्.आर्.) पतसंस्थेतील आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई करून अनेक  पुरावे शासनाधीन केले आहेत. यात अनुमाने १ सहस्र १०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार  झाला आहे.

बंदीवानांकडून मार खाणारे कारागृह अधीक्षक !

‘यवतमाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ब्रिटीशकालीन जिल्हा कारागृह वर्ग १ येथे १.१२.२०२० या दिवशी सकाळी कारागृह अधीक्षक (श्रेणी २) प्रत्येक बॅरेकमध्ये जाऊन बंदीवानांची पडताळणी करत होते.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशभरातील २६ कार्यालयांवर ईडीच्या धाडी

केंद्र सरकारने लवकरात लवकर या जिहादी संघटनेवर बंदी घातली पाहिजे, अशीच हिंदूंची मागणी आहे !

रेखा जरे हत्या प्रकरणात पत्रकारानेच सुपारी देऊन केली हत्या !

रेखा जरे यांची हत्या ३० नोव्हेंबरच्या रात्री धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून करण्यात आली. पत्रकार बोठे यांनी जरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आतापर्यंत ५ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पुनर्अन्वेषणाचा आदेश वैयक्तिक द्वेषापोटी, प्रकरण सी.बी.आय्.कडे हस्तांतरित करावे !

वास्तूसजावटकार अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी मला अनधिकृत आणि सूडबुद्धीने अटक करण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अधिकार नसतांनाही केवळ माझी छळवणूक करण्याच्या उद्देशाने या प्रकरणाच्या पुनर्अन्वेषणाचा आदेश दिला आहे.

अन्वय नाईक आत्महत्येच्या प्रकरणात रायगड पोलिसांकडून आरोपपत्र प्रविष्ट

अन्वय नाईक आत्महत्येच्या प्रकरणात रायगड पोलिसांनी अलिबाग सत्र न्यायालयात ४ डिसेंबर या दिवशी आरोपपत्र प्रविष्ट केले आहे.

काही आठवड्यांत कोरोना लसीचे संशोधन पूर्ण होईल ! – पंतप्रधान मोदी

सध्या जगभरात विविध आस्थापने कोरोनावरील लस वितरित करतांना दिसत आहेत. त्या लसींची किंमत तुलनेने अधिक आहे. सर्व जग सध्या वाजवी दरातील परिणामकारक लसीची वाट पहात आहे. त्यामुळे जगाचे लक्ष भारतात चालू असलेल्या संशोधनाकडेही आहे.

कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सी.एम्. कर्णन यांना अटक

सर्वोच्च आणि उच्च न्यायालय यांचे काही न्यायाधीश महिला अधिवक्त्यांचा अन् न्यायालयातील महिला कर्मचार्‍यांचा लैंगिक छळ करतात, असा आरोप केल्याच्या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सी.एम्. कर्णन यांना येथील पोलिसांनी अटक केली.

पुण्यात हवाला व्यवहारावर गुन्हे शाखेची कारवाई !

अवैध गुटखाविक्रीद्वारे प्राप्त केलेल्या मोठ्या रक्कमेची हवाला व्यवहाराच्या माध्यमातून देवाणघेवाण करण्याचा प्रकार गुन्हे शाखेने २ डिसेंबरच्या मध्यरात्री उघडकीस आणला.