अश्‍लील ध्वनिचित्रफीत दाखवून लैंगिक अत्याचार करणार्‍या २ युवांवर गुन्हा नोंद

अल्पवयीन मुलांना भ्रमणभाषवर अश्‍लील ध्वनिचित्रफीत दाखवून त्यांच्यावर अत्याचार केल्याची तक्रार फलटण पोलिसात नोंदवण्यात आली.

चारचाकी दरीत कोसळून युवती ठार, दोनजण घायाळ

सातारा-कास रस्त्यावरील गणेश खिंडीत एक अल्टो गाडी कोसळून अपघात झाला.

श्रीनगर येथे आतंकवाद्यांच्या आक्रमणात एक पोलीस आणि नागरिक घायाळ

श्रीनगर येथील आलमगिरी बाजारात जिहादी आतंकवाद्यांनी सुरक्षादल आणि पोलीस यांच्या वाहन ताफ्यावर केलेल्या आक्रमणामध्ये एक पोलीस अन् एक नागरिक घायाळ झाले.

रेखा जरे हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठेंच्या विरोधात ‘लूकआऊट नोटीस’ जारी !

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे यांच्या विरोधात पोलिसांनी ‘लूकआऊट नोटीस’ जारी केली आहे.

पाळधी (जिल्हा जळगाव) येथील ग्रामपंचायत कार्यालयात टिपू सुलतानचे छायाचित्र लावणार्‍या धर्मांधांना अटक करा !

धर्मांधांनी ग्रामपंचायत कार्यालयात हिंदू महिलांवर अत्याचार, मंदिरांचा विध्वंस, हिंदु धर्मावर आघात करणार्‍या टिपू सुलतानचे छायाचित्र बळजोरीने लावले.

‘मराठा विकास प्राधिकरणा’च्या विरोधात कर्नाटकमध्ये कन्नड संघटनांचा राज्यव्यापी बंद

बंद म्हणजे जनतेला वेठीस धरणे होय ! यामुळे देशाचीही वित्तहानी होते. यामुळे अशी आंदोलने करणार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !

देहली दंगल भडकावणार्‍या इस्लामी संघटनेकडून आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांना साहाय्य

शेतकर्‍यांच्या आंदोलनात खलिस्तान्यांचाही समावेश आहे, हे उघड होत असतांना आणि जिहादी विचारसरणीचेही लोक यात सहभागी होतांना दिसत असल्याने हे आंदोलन आता देशविरोधी होऊ लागले आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये !

शेतकरी आंदोलनाच्या नावाने त्यात घुसलेल्या धर्मांध संघटना !

नवी देहलीच्या सीमेवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना साहाय्य करणार्‍या संघटनांमध्ये देहली दंगलीच्या प्रकरणी नाव आलेल्या ‘युनायटेड अगेन्स्ट हेट’ (यू.ए.एच्.) या इस्लामी संघटनेचाही समावेश आहे. तिला २५ मशिदींमधून साहाय्य मिळत आहे.

पोलीस दलात परीक्षेसाठी बनावट उमेदवार देणार्‍या सूत्रधारास अटक 

कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलामध्ये हवालदार आणि आय.आर्.बी. नेमणुकीसाठी २२ नोव्हेंबर या दिवशी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला बनावट उमेदवारांनी परीक्षा दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

शिकारीसाठी अवैधरित्या शस्त्रे घेऊन फिरणारे १६ जण पोलिसांच्या कह्यात

एवढ्या मोठ्या प्रमाणातील शस्त्रे केवळ शिकारीसाठीच बाळगली असतील, यावर विश्‍वास कसा ठेवायचा ?