कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त

पुणे – अवैध गुटखाविक्रीद्वारे प्राप्त केलेल्या मोठ्या रक्कमेची हवाला व्यवहाराच्या माध्यमातून देवाणघेवाण करण्याचा प्रकार गुन्हे शाखेने २ डिसेंबरच्या मध्यरात्री उघडकीस आणला.
या कारवाईत मोठी रोकड जप्त करण्यात आली असून ८-९ जणांना कह्यात घेतले आहे. (अवैध धंद्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. – संपादक)
पोलिसांनी हवाला व्यवहार करणार्या ४ कार्यालयांवर कारवाई केली असून नोव्हेंबरमध्ये लोणी काळभोर परिसरात अवैध गुटखाविक्री प्रकरणात एकाला पकडण्यात आले होते. त्याच्याकडे केलेल्या चौकशीवरून अवैध गुटखाविक्रीतून मिळालेली रोकड हवाला व्यवहारातून संबंधितांपर्यंत पोचवण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती.
अल्पवयीन मुलीची प्रसूती करून नवजात बाळाच्या विक्रीचा प्रयत्न !
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ
तरुणांकडून रिक्शाचालकाला मारहाण !
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांमधून होणारी विद्यार्थ्यांची लूट तात्काळ थांबवा !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक