देशातील प्रथम १० पोलीस ठाण्यांच्या सूचीत सांगे पोलीस ठाण्याचा समावेश

केंद्रीय गृहमंत्रालयाने वर्ष २०२० साठी सिद्ध केलेल्या देशातील प्रथम १० पोलीस ठाण्यांच्या सूचीत सांगे पोलीस ठाण्याचा समावेश आहे. राज्यातील १६ सहस्र ६७१ पोलीस ठाण्यांमधून ही निवड करण्यात आली आहे.

यवतमाळ जिल्हा कारागृहातील बंदीवानाकडून पोलीस अधिकार्‍यावर प्राणघातक आक्रमण

शहराच्या मध्यवर्ती असलेल्या ब्रिटीशकालीन जिल्हा कारागृह वर्ग १ येथे १ डिसेंबर या दिवशी सकाळी कारागृह अधीक्षक (श्रेणी २) प्रत्येक बॅरेकमध्ये जाऊन बंदीवानांची पडताळणी करत होते. तेव्हा त्यांच्यावर राहुल उपाख्य सिन्नू शिंदे या बंदीवानाने दाढी करण्याच्या कारणावरून प्राणघातक आक्रमण केले.

२६ लाख रुपयांचे चंदन शिक्रापूर (जिल्हा पुणे) येथे स्थानिक गुन्हे शाखेकडून कह्यात

मुळशी आणि भोसरी परिसरातून चोरून आणलेला अनुमाने २६ लाख रुपयांचा चंदनाचा साठा घेऊन नगर येथे निघालेल्या चंदन तस्करांना स्थानिक गुन्हे शाखेने १ डिसेंबरच्या मध्यरात्री शिक्रापूर येथे पकडले आहे.

विवाह कार्यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका आणि पोलीस यांची अनुमती बंधनकारक ! – प्रशासनाचा निर्णय

येत्या जानेवारी, फेब्रुवारी मध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर पालिका आणि जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. विवाह कार्यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका आणि पोलीस यांची अनुमती बंधनकारक करण्यात आली आहे.

नाशिक येथील नगरसेवक भगवान कटारिया यांच्यावर धर्मांधाकडून आक्रमण

नगरसेवक भगवान कटारिया यांच्यावर अस्लम सईद सैय्यद या संशयितIने आक्रमण करत त्यांना शिवीगाळ केली.

मुंबई येथे अमली पदार्थांची विक्री करणार्‍या धर्मांध महिलेला अटक

अमली पदार्थांची विक्री करणार्‍या शाबिना खान या महिलेला १ डिसेंबर या दिवशी मुंबई पोलिसांनी अटक केली.

मुसलमान तरुणाचे हिंदु मुलीशी विवाह करण्यासाठी धर्मांतर

मुसलमान तरुणाने केलेले धर्मांतर किती दिवस टिकणार ? कि तो नंतर हिंदु तरुणीचेच धर्मांतर करणार ? असे प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित झाल्यास आश्‍चर्य ते काय ?

कर्नाटकच्या माजी मंत्र्यांचे अपहरण आणि सुटका  

माजी मंत्री वार्थुर प्रकाश यांचे अपहरण केले होते मात्र दुसर्‍या दिवशी त्यांची सुटका केली. या अपहरणामागील नेमके कारण समजू शकलेले नाही.

देहलीतील पोलीस केंद्र सरकारच्या अखत्यारित असतांना अशा प्रकारच्या घटना घडणे लज्जास्पद !

देहली येथील कैलाश विहार पंसारी भागात शिवशक्ती मंदिरामध्ये तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे.

पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांनी होंडा येथील स्थानिक नेत्याला मारहाण केल्याने तणाव

खनिज मालाच्या वाहतुकीवरून आंदोलन करणारे स्थानिक नेते तथा होंडा (सत्तरी) पंचायतीचे माजी सरपंच आणि विद्यमान पंचसदस्य सुरेश माडकर यांना वाळपई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांनी मारहाण केल्याच्या आरोपावरून होंडा येथे २ डिसेंबर या दिवशी सकाळी तणावाचे वातावरण निर्माण झाले.