चैत्र यात्रेच्या कालावधीत पंढरपूर शहरात मांसविक्रीस मनाई !
प्रशासनाने काढलेले आदेश स्तुत्यच असून खरेतर पंढरपूर-आळंदी अशा तीर्थक्षेत्री वर्षभरच मांसविक्रीस मनाई असणे अपेक्षित आहे !
प्रशासनाने काढलेले आदेश स्तुत्यच असून खरेतर पंढरपूर-आळंदी अशा तीर्थक्षेत्री वर्षभरच मांसविक्रीस मनाई असणे अपेक्षित आहे !
श्री विठ्ठल-रुक्मिणीदेवीच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांना भक्तनिवासातील खोल्या नोंदणी करण्यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर भाविकांना ‘ऑनलाईन’ नोंदणी करता येणार आहे.
या आदेशामुळे महसूल विभागाला दणका बसला. अमरावतीच्या अतिरिक्त जिल्हाधिकार्यांनी प्रकरणाचे अधिक सखोल अन्वेषण करून पुन्हा सुनावणीचे निर्देश दिले.
पंढरपूर – पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने चंद्रभागा नदीपात्रातील नदी काठाचा कचरा आणि नदीतील शेवाळे काढण्याचे काम हाती घेतले आहे. सध्या चंद्रभागेमध्ये अतिशय अत्यल्प प्रमाणात पाणी राहिले आहे. पाणी वहाते नसल्याने शेवाळ्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. पाण्याची पातळी न्यून झाल्याने नदीपात्रात भाविकांना स्नान करतांना अडचणी निर्माण होत आहेत. याची नोंद घेत प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन … Read more
तुळजापूर पुनर्विकास आणि तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कार्यवाहीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणीमातेच्या नित्यपूजेसाठी अनुक्रमे २५ सहस्र आणि ११ सहस्र रुपये, पाद्यपूजेसाठी ५ सहस्र रुपये, तर तुळशी अर्चन पूजेसाठी २१ सहस्र रुपये घेण्यात येईल.
समस्त महाराष्ट्राचे आराध्यदैवत पंढरपूरचा श्री विठोबा आणि देवी श्री रुक्मिणी यांच्या मंदिराचे वर्ष १९८५ मध्ये सरकारीकरण झाले. तेव्हापासून देवतांच्या दागिन्यांचे मूल्यांकन होत नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज, पहिले बाजीराव पेशवे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर …
महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर परत एकदा रासायनिक लेपन करण्याच्या सूचना पुरातत्व विभागाने दिल्याची माहिती मिळत आहे. खरेतर यापूर्वी वर्ष २०२० मध्येही ते करण्यात आले.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रात संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, हा शब्द मी देतो. धर्माचे रक्षण करणे, हे आपल्या सर्वांचे दायित्व आहे.
मंदिर समितीने या संस्थेविरुद्ध अनेक वेळा ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून आणि समज देऊनही सुधारणा होत नसल्याने शुभम सर्व्हिसेस, पुणे यांच्याशी असलेला करार रहित करण्यात आल्याचे मंदिर समिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी या वेळी सांगितले.