श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या प्राचीन दागिन्यांच्या मूल्यांकनासाठी मूल्याकनकर्त्यांची नियुक्ती ! – ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सहअध्यक्ष, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती

भाविक ज्या श्रद्धेने देवाला दागिने देतात, त्यांचे योग्य मूल्यांकन होण्यासाठी अधिकृत मूल्यांकनकर्ते प्रत्येक देवस्थानासाठी असणे अपेक्षित आहे !

१ ऑक्टोबरपासून श्री विठ्ठलदर्शन आणि पूजानोंदणी ‘ऑनलाईन’ पद्धतीने !

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठलाचे आणि श्री रुक्मिणीमातेचे दर्शन, नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशीपूजा, चंदन उटी पूजा अशा सर्व पूजांची नोंदणी आता १ ऑक्टोबरपासून ‘ऑनलाईन’ पद्धतीने करण्यात येणार आहे.

आगाऊ रक्कम दर्शन साखळीत ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती’पैकी कुणी आहे का ? याची चौकशी करा !

पंढरपूर येथे ठाणे येथील भाविक श्री. चेतन काबाडे यांनी ४ सहस्र रुपये रक्कम श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दिली. या प्रकरणी दर्शन झाल्यावर पावती न मिळाल्याने त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी शुल्क घेणार्‍या व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! यासाठी मंदिरे भक्तांच्याच कह्यात असणे आवश्यक आहे !

पंढरपूर येथील पूरग्रस्तांना मंदिर समितीच्या वतीने खाद्यपदार्थांची पाकीटे ! – ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर

५०० पूरग्रस्तांना विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती यांच्या वतीने दिवसातून ३ वेळा खाद्यपदार्थांची पाकीटे देण्यात येत आहेत, अशी माहिती समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

१५ ऑगस्टनंतर पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या पुढील कामास प्रारंभ !

राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासाठी राज्यशासनाने ७३ कोटी रुपयांचा आराखडा संमत केला आहे. या निधीतून मंदिर समूह आणि परिवार देवता यांच्या मंदिरांचे जतन केले जात आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांचे स्थानांतर : मनोज श्रोत्री नवीन व्यवस्थापक !

पुदलवाड यांचा कारभार वादग्रस्त होता. त्यांच्या कारभारावर अनेक वेळा वारकर्‍यांनी खेद व्यक्त केला होता,  विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आंदोलन केले होते.

आषाढी वारीच्‍या काळात मद्य-मांसाची दुकाने तात्‍काळ बंद करण्‍याचे मुख्‍यमंत्र्यांचे आदेश !

हिंदु जनजागृती समिती आणि शिवसेना आध्‍यात्मिक आघाडी यांनी घेतली मुख्‍यमंत्र्यांची भेट

वारी : भावभक्तीचा महासागर !

‘विठुमाऊली तू, माऊली जगाची’, असा विठ्ठलमहिमा आळवत लक्षावधी वारकरी प्रतिवर्षी वारीला जातात आणि परत आल्यावर स्वतःपुरतीच नव्हे, तर परिसरातही विठ्ठलाची उपासना उत्साहाने चालू करतात.

वारकर्‍यांची अनुपम विठ्ठलभक्ती !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी वारकऱ्यांचे जाणून घेतलेले मनोगत इथे प्रस्तुत करीत आहोत.