उत्तरप्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांच्या महंमद पैगंबर यांच्या चरित्रावरील पुस्तकाचे महंत यति नरसिंहानद यांच्या हस्ते प्रकाशन

शिया धर्मगुरुंकडून पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी

यति नरसिंहानंद सरस्वती यांच्या हस्ते वसीम रिझवी यांचे ‘मोहंमद’ या पुस्तकाचे प्रकाशन

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी गाझियाबादमधील डासना येथील श्री महाकाली मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी येथील महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांच्या हस्ते त्यांचे ‘मोहंमद’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. वसीम रिझवी यांनी काही मासांपूर्वी कुराणमधून २६ आयते हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळून त्यांना ५० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला होता.

(सौजन्य : Zee Uttar Pradesh UttaraKhand)

शिया धर्मगुरु मौलाना सैफ अब्बास यांनी रिझवी यांच्या नव्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, रिझवी यांनी जगातील सर्व मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यांनी कुराणाची अपकीर्ती केली आहे. आम्ही सरकारकडे मागणी करतो की, सरकारने रिझवी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.

 (सौजन्य : Vishalviews)

वसीम रिझवी

इस्लामचा प्रसार कसा झाला आणि त्याचा उद्देश काय ? हे पुस्तकातून लक्षात येईल ! – वसीम रिझवी

‘मोहंमद’ या पुस्तकाविषयी वसीम रिझवी यांनी सांगितले की, इस्लाम या जगामध्ये का आला ? आणि त्यामध्ये आतंकवादी विचार का आहेत ? याची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. या पुस्तकातून महंमद पैगंबर यांचे चरित्र देण्यात आले आहे. हे पुस्तक धर्मांतर रोखण्यास साहाय्यभूत ठरेल. या पुस्तकातून इस्लामी कट्टरतावादी विचारसरणी समजावण्यात आली आहे. इस्लाम कशा प्रकारे पसरला ? आणि त्याचा उद्देश काय आहे ?, हे सर्व या पुस्तकातून लक्षात येईल.