अ‍ॅमेझॉनवर कठोर कारवाई करा ! – ‘कॅट’ची मागणी

  • ‘अमेझॉन’द्वारे गांजा आणि बाँब बनवण्याच्या साहित्यांच्या विक्रीचे प्रकरण 

  • देशभरात ५०० हून अधिक जिल्ह्यांत १ सहस्र २०० हून अधिक ठिकाणी धरणे आंदोलन

  • अशी मागणी का करावी लागते ? पोलीस आणि प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही कि गांजा अन् बाँब बनवण्याचे साहित्य विकण्याला त्यांची अनुमती आहे ? – संपादक 
  • ‘कॅट’ म्हणजे अखिल भारतीय व्यापारी महासंघ (‘कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’) – – संपादक 

नवी देहली – अमेरिकेतील बलाढ्य आस्थापन ‘अमेझॉन’वरून गांजा आणि बाँब बनवण्याची साधनसामग्री, देशात बंदी घातलेली काही रसायने ग्राहकांना सहज उपलब्ध होत असल्याचे समोर आल्यामुळे या आस्थापनावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. यातच आता देशातील ‘कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने (‘कॅट’ने) या आस्थापनाच्या विरोधात २४ नोव्हेंबर या दिवशी देशातील वेगवेगळ्या राज्यांत ५०० हून अधिक जिल्ह्यांत १ सहस्र २०० हून अधिक ठिकाणी धरणे आंदोलन केले. ‘अमेझॉन’ने देशातील कायदे आणि नियमांनुसार व्यवसाय करावा अथवा भारतातून निघून जावे’, अशी चेतावणी ‘कॅट’ने दिली. ‘देशात सामान्यांसाठी आणि मोठ्या आस्थापनांसाठी वेगवेगळे कायदे आहेत का ?’ असा प्रश्‍नही या संघटनेने विचारला. ‘या प्रकरणात ठोस कारवाई करण्यात आली नाही, तर देशातील व्यापारी ‘भारत व्यापार बंद’ करतील’, अशीही चेतावणी त्यांनी दिली.