भारतीय खेळाडूंना केवळ ‘हलाल’ मांस देण्याची कोणतीही योजना नाही ! – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ

उजवीकडे बीसीसीआय मंडळाचे कोषाध्यक्ष अरुण धूमल

नवी देहली – भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार्‍या कसोटी क्रिकेट सामन्यांच्या आधी भारतीय संघातील खेळाडूंच्या आहारामध्ये ‘हलाल’ मांसाचाच वापर करण्यात येणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. याला विविध स्तरांवरून विरोध करण्यात येत आहे. यासंदर्भात राष्ट्रीय स्तरावर ट्विटर ट्रेंडही करण्यात आला होता. यावर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (‘बीसीसीआय’ने) स्पष्टीकरण दिले आहे. मंडळाचे कोषाध्यक्ष अरुण धूमल यांनी म्हटले आहे की, भारतीय खेळाडूंसाठी अशी कोणतीही योजना बनवण्यात आलेली नाही. ते त्यांना हवे ते पदार्थ खाऊ शकतात. ही त्यांची वैयक्तिक गोष्ट आहे.