त्रिपुरामध्ये जमावाकडून मशीद, घरे आणि दुकाने यांची तोडफोड आणि जाळपोळ

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांच्या विरोधात विश्‍व हिंदु परिषदेच्या मोर्च्याच्या वेळी हिंसाचार !

आगरतळा (त्रिपुरा) – उत्तर त्रिपुरा जिल्ह्यातील चमटिल्ला भागातील रोवा बाजारात विश्‍व हिंदु परिषदेने आयोजित केलेल्या एका मोर्च्याच्या वेळी जमावाकडून एका मशिदीची आणि मुसलमानांच्या ३ घरांची तोडफोड करण्यात आली, तसेच २ दुकाने पेटवून देण्यात आली. सुरक्षादल वेळीच घटनास्थळी पोचले आणि त्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. हा मोर्चा बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाच्या विरोधात काढण्यात आला होता.

याविषयी भाजपचे प्रवक्ते नबेंदू भट्टाचार्य यांनी म्हटले, ‘मला याविषयी काहीही ठाऊक नाही. जर अशी काही घटना घडली असेल, तर पोलिसांनी योग्य कारवाई केली पाहिजे.’ दुसरीकडे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने या घटनेचा निषेध करत पीडितांना योग्य हानीभरपाई देण्याची मागणी केली आहे. (धर्मांधांकडून केरळमध्ये आणि देशात इतरत्र जेव्हा आक्रमणे होतात, तेव्हा माकप अशी मागणी करतो का ? कि ‘मानवाधिकार केवळ धर्मांधांनाच आहे हिंदूंना नाहीत’, असे माकपवाल्यांना वाटते ? ‘बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी माकपने एखादा मोर्चा का काढला नाही आणि धर्मांधांचा निषेध का केला नाही ?’, याचे उत्तर त्याने दिले पाहिजे ! – संपादक)