‘राष्ट्राभिमान’ महत्त्वाचा कि अभिव्यक्तीस्वातंत्र्य ?

वन आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

राज्याचे नवनियुक्त वन आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतल्याच्या पहिल्याच दिवशी विभागातील सर्व अधिकारी अन् कर्मचारी यांना ‘हॅलो’ ऐवजी ‘वन्दे मातरम्’ म्हणण्याचे आवाहन केले. मुनगंटीवार यांनी घेतलेला निर्णय निश्चितच अभिनंदनीय आहे; परंतु या आवाहनाला रझा अकादमीचे अध्यक्ष महंमद सईद नूरी यांनी विरोध दर्शवला आहे. हा देश हिंदूबहुल असूनही या देशात धर्मांध मुसलमानांकडून गणेraशोत्सवाच्या मिरवणुकीवर होणारी दगडफेक, हिंदूंवरील आक्रमणे, गोहत्या, हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणे, हिंदु नेत्यांच्या हत्या हे आघात हिंदूंनी सहन केले. काँग्रेससह सर्व पुरोगामी पक्षांनी धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव या नावाखाली मुसलमानांच्या या धर्मांधतेला झाकण्याचा प्रयत्न केला; परंतु आता ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यास नकार देऊन धर्मांध राष्ट्रीयत्वाच्या प्रकटीकरणालाच उघडपणे आव्हान देत आहेत. आतापर्यंत मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी त्यांचा ‘हिंदुद्वेष’ झाकण्याचे पाप राजकारण्यांनी केले; परंतु लांगूलचालनासाठी त्यांच्या राष्ट्रद्रोहाकडे दुर्लक्ष करणे देशाला परवडणारे नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या भुजांमध्ये खरोखरच बळ असते, तर त्यांनी ‘वन्दे मातरम्’ न म्हणणार्‍यांना जाब विचारला असता; परंतु त्यांनी ‘आम्ही ‘जय महाराष्ट्र’ म्हणू’, अशी राजकीय सोयीची भूमिका घेतली. ‘वन्दे मातरम्’ हा मुळात पक्षीय राजकारणाचा विषयच नाही. महाराष्ट्रातील सत्ताधारी असो वा विरोधी पक्ष, यांतील एकाही नेत्याने ‘भारतात रहाणार्‍या प्रत्येक व्यक्तीला मातृभूमीला वंदन करावेच लागेल’, अशी प्रखर राष्ट्रवादाची भूमिका घेतली नाही. उलट काही नेत्यांनी ‘वन्दे मातरम्’ म्हणणे हे ऐच्छिक असल्याची गुळमुळीत भूमिका घेतली. महाराष्ट्रात जर अशी भूमिका मांडण्यात येत असेल आणि त्याविषयी कोणत्याही पक्षाला आक्षेप वाटत नसेल, तर मग संपूर्ण देशातच ‘वन्दे मातरम्’ म्हणणे ऐच्छिक असल्याचे घोषित करा; परंतु हे करतांना ‘वन्दे मातरम्’ हे इस्लामविरोधी आहे. मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावतात. त्यामुळे ते ऐच्छिक करत आहोत’, असे मात्र अवश्य नमूद करा. तसे करतांना जे क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले आहे, त्यांच्या प्रतिमेच्या पुढे नाक घासून ‘राष्ट्राच्या सार्वभौमत्वापेक्षा मुसलमानांच्या धार्मिक भावना आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. ते दुखावले गेले, तर देशात हिंसाचार माजेल. तो आम्हाला नको आहे. मुसलमानांचे लांगूलचालन करून देशात एकता टिकावी आणि राष्ट्राच्या एकतेसाठीच आम्ही ‘वन्दे मातरम्’ ऐच्छिक करत आहोत’, असा राष्ट्रवादाचा मुलामाही लावायला विसरू नका. किमान पक्षाच्या नावातील ‘राष्ट्रवादी’ शब्द तरी काढा !

हिंदूंनी ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वन्दे मातरम्’, म्हणायचे आणि मुसलमानांनी ‘अल्ला व्यतिरिक्त आम्ही कुणापुढेही मान झुकवत नाही’, असे म्हणायचे. यामध्ये खरेतर हिंदूंची भूमिका ‘राष्ट्रवादी’ आणि मुसलमानांची भूमिका ‘धर्मांध’ आहे. मग छगन भुजबळ कोणत्या तोंडाने मुसलमानांच्या भूमिकेचे समर्थन करतात ? त्यांच्यात ‘राष्ट्रवाद’ जिवंत असता, तर ‘राज्यघटना आम्हाला कोणत्याही धर्मापेक्षा राष्ट्रहिताची जोपासना करायला सांगते’, हे त्यांनी छातीठोकपणे सांगितले असते. एरव्ही शाहु, फुले, आंबेडकर यांची नावे घ्यायची आणि मुसलमानांशी संबंधित विषय आला की, राज्यघटनेलाही तिलांजली द्यायची, हा कोणता राष्ट्रवाद ? ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीयत्वाचे प्रतीक आहे’, हे सांगण्याचे धाडस भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या नेत्यामध्ये नसेल, तर किमान पक्षाच्या नावातील ‘राष्ट्रवादी’ हा शब्द तरी काढून टाकावा. ‘राष्ट्रवाद’ गहाण ठेवलाच आहे, तर लपूनछपून कशाला ? थेटच भूमिका घ्या. त्यातून आणखी काही मते तरी झोळीत पडतील.

मुसलमानांचे तळवे चाटणार कि प्रखर राष्ट्रवाद जोपासणार ?

स्वातंत्र्यपूर्वकाळात काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन ‘वन्दे मातरम्’चा घोष करत गांधींच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने केली आहेत. त्या काँग्रेस पक्षाचे नेते ‘वन्दे मातरम्’विषयी बोलायलाही सिद्ध नाहीत. काय ही काँग्रेसची दयनीय स्थिती ! काँग्रेसच नव्हे, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांसह देशभरातील पक्ष जर ‘वन्दे मातरम्’विषयी सोयीस्कर भूमिका घेणार असतील, तर राष्ट्रप्रेमी नागरिकांना ते कधीही रुचणारे नाही. मुसलमानांचे लांगूलचालन करायचे कि क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांच्याप्रमाणे प्रखर ‘राष्ट्रवाद’ जोपासायचा ? हे राजकीय पक्षांनी ठरवावे.

‘वन्दे मातरम्’ म्हणणार नाही’, ‘राष्ट्रध्वजाला वंदन करणार नाही’, ‘राज्यघटनेऐवजी शरीयतला मानू’, असे म्हणणार्‍या मुसलमानांविषयी आमचे एकच म्हणणे आहे. त्यांनी हे पाकिस्तानमध्ये जाऊन करावे. ज्या भारतभूमीने अंगाखांद्यावर खेळवले, अन्न-निवारा दिला, हेच काय शेवटची कबरही ज्या मातृभूमीत खोदली जाते, त्या भूमीला ‘वंदन करणार नाही’, असे म्हणणे हा कोणता धर्म ? जे मुसलमान भारतात राहून राष्ट्रप्रेम जोपासतात, ते हिंदूंना नेहमीच प्रिय आहेत; परंतु जे ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यास नकार देत आहेत, त्यांच्यात कधी राष्ट्रप्रेम रूजू शकत नाही, हे भारत सरकारने लक्षात घेऊन त्यांची योग्य ती व्यवस्था करावी. या भारतभूमीसाठी अनेक राष्ट्रपुरुषांनी ‘वन्दे मातरम्’ म्हणत हौतात्म्य पत्करले आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यास नकार देणे म्हणजे त्यांच्या हौतात्म्याचा अवमान आहे. ‘वन्दे मातरम्’ न म्हणणे हे अभिव्यक्तीस्वातंत्र्याखाली आणणे म्हणजे ‘राष्ट्राभिमानही आता अभिव्यक्तीस्वातंत्र्याखाली आणणार का ?’, असा प्रश्न उपस्थित होतो. धर्मांध मुसलमान ‘वन्दे मातरम्’ न म्हणता राष्ट्रवादाला फाटा देणार असतील आणि राजकारणी त्याकडे दुर्लक्ष करणार असतील, तर राष्ट्रप्रेमी नागरिकांनाही ‘असे नेते अन् राजकीय पक्ष यांना निवडून आणायचे का ?’, हा विचार करावा लागेल.

ज्या ‘वन्दे मातरम्’या घोषणेने लाखो स्वातंत्र्यसैनिकांना स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा दिली, ते ऐच्छिक ठरवणे दुर्दैवी !