मुंबई – अभिनेते आमीर खान यांचा ‘लाल सिंग चढ्ढा’ हा चित्रपट त्यांच्या आतापर्यंतच्या व्यवसायात सर्वाधिक अपयशी ठरला आहे. त्याची प्रतिदिनची कमाई दिवसेंदिवस अल्प होत आहे. तिकीट खिडकीवर (‘बॉक्स ऑफिस’वर) हा चित्रपट अपयशी ठरल्याने आमीर खान आता तो ‘ओटीटी’द्वारे (चित्रपट आदी पहाण्याच्या ऑनलाईन माध्यमाद्वारे) प्रदर्शित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत; पण आमीर खान यांच्याकडून त्याच्या हक्कांसाठी अधिक पैसे मागितले जात असल्याने ‘नेटफ्लिक्स’ने संबंधित करार रहित केल्याचे समजते. त्यामुळे तेथेही आमीर यांना नकारच मिळाला आहे. आमीर यांनी प्रारंभी ‘नेटफ्लिक्स’कडे १५० कोटी रुपयांची मागणी केली होती; पण ‘नेटफ्लिक्स’ने खान यांना केवळ ५० कोटी देण्याचे ठरवले. आमीर खान हे १२५ कोटी रुपयांवर अडून होते. ‘नेटफ्लिक्स’ला ही किंमत अधिक वाटल्याने त्याने करार तूर्तात रहित केला. ज्या चित्रपटावर लोकांनी बहिष्कार घातला आहे, तो चित्रपट आपल्या ‘प्लॅटफॉर्म’वर घेऊन प्रेक्षकांचा रोष पत्करण्यास कोणतेही डिजीटल माध्यम सिद्ध नाही.
संपादकीय भूमिकाराष्ट्र आणि धर्म यांना विरोध केल्यावर पदरी काय पडते, याचा चांगलाच धडा अभिनेते आमीर खान यांना मिळाला आहे ! अन्य अभिनेते आणि अभिनेत्री यांनी यांतून बोध घ्यावा ! |