संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील पाकिस्तानी आतंकवाद्यावरील निर्बंधाच्या प्रस्तावाला चीनचा विरोध

न्यूयॉर्क (अमेरिका) – संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारत आणि अमेरिका यांनी पाकिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहर याचा लहान भाऊ अब्दुल रौफ अजहर याच्यावर जागतिक स्तरावर निर्बंध घालण्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला ‘प्रतिबंध समिती’च्या १५ सदस्यांची सहमती असती, तर तो संमत करण्यात आला असता; मात्र त्याला चीनने विरोध केला. अब्दुल रौफ अजहर हा कंदहार विमान अपहरणातील एक आरोपी आहे.

१. चीनच्या प्रवक्त्याने म्हटले की, आम्हाला या प्रस्तावावर विचार आणि अभ्यास करायला थोडा अजून वेळ हवा आहे. समितीमध्ये अशा प्रस्तावांना रोखण्याचा नियम असून अशा प्रकारे कित्येक प्रस्ताव रोखलेले आहेत.

२. अमेरिकेच्या प्रवक्त्याने सांगितले की, यावर्षी चीनने दुसर्‍यांदा पाकिस्तानी आतंकवाद्यावरील निर्बंधांना विरोध केला आहे. याआधी लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी अब्दुल अर रहमान मक्की याच्यावरील निर्बंधांच्या प्रस्तावालाही चीनने विरोध केला होता.

संपादकीय भूमिका

चीन स्वतः उघूर मुसलमानांवर अत्याचार करत आहे,  तर अन्य देशांतील जिहादी आतंकवाद्यांचा बचाव करत आहे, हा चीनचा दुटप्पीपणा आहे !