पाकिस्तानी गुप्तहेराला देहलीत अटक

गुप्तहेर हा भारतीय नागरिकत्व स्वीकारलेला मूळचा पाकमधील हिंदु !

‘भागचंद’ पाकिस्तानी गुप्तहेर

नवी देहली – पाकिस्तानला भारताची गुप्त माहिती पुरवणार्‍या एका हेराला राजस्थानमधील गुप्तचर विभागातील अधिकार्‍यांनी देहलीतून अटक केली. भागचंद असे त्याचे नाव आहे. तो मूळचा पाकमधील हिंदु असून त्याने ३ वर्षांपूर्वी भारतात आश्रय घेऊन भारताचे नागरिकत्व स्वीकारले आहे. देहलीत राहून तो टॅक्सी चालवण्याचा व्यवसाय करत होता. तो पाकच्या संपर्कात होता आणि देहलीतील संवेदनशील ठिकाणांची माहिती पाकिस्तानला पाठवत होता, अशी माहिती राजस्थानच्या गुप्तचर विभागाचे अतिरिक्त महासंचालक उमेश मिश्रा यांनी दिली.

१४ ऑगस्टला नारायण लाल गद्री नावाच्या व्यक्तीला हेरगिरीच्या आरोपाखाली भिलवाडा येथून अटक करण्यात आली होती. गद्री याच्या भ्रमणभामधील माहितीच्या आधारे त्याच्यासमवेत भागचंद हाही हेरगिरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, असेही मिश्रा यांनी सांगितले. (पाकिस्तान भारताच्या विरोधात कोणकोणत्या क्लुप्त्या लढवत आहे, हेच यातून स्पष्ट होते. अशा पाकला समूळ नष्ट केल्यासच सर्व समस्या सुटू शकतील, हे सरकारने जाणावे ! – सपांदक)