योगी देवनाथ यांना धर्मांधाकडून शिरच्छेद करण्याची धमकी

शाहरूख खान यांच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केल्याचे प्रकरण

डावीकडे गुजरातमधील हिंदु युवा वाहिनीचे माजी प्रदेशाध्यक्ष योगी देवनाथ

कर्णावती (गुजरात) – गुजरातमधील हिंदु युवा वाहिनीचे माजी प्रदेशाध्यक्ष योगी देवनाथ यांना सामाजिक माध्यमांद्वारे ठार मारण्याची ‘सलीम अली’ या ट्विटर खात्यावरून  देण्यात आली. यावर पोस्ट केलेल्या एका चित्रामध्ये एका व्यक्तीच्या हातात योगी देवनाथ यांचे कापलेले शिर असल्याचे, तर दुसर्‍या हातात बंदूक असल्याचे दाखवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. सध्या ही पोस्ट पुसून टाकण्यात आल्याचे, तसेच हे खातेही बंद करण्यात आल्याचे दिसून आले आहे. सामाजिक माध्यमांतून योगी देवनाथ यांना संरक्षण देण्यासह आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.

योगी देवनाथ यांनी अभिनेता शाहरूख खान यांचा आगामी हिंदी चित्रपट ‘पठाण’वर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. त्याला विरोध म्हणून योगी देवनाथ यांना ही धमकी देण्यात आली. सलीम अली खात्यावर शाहरुख आणि त्यांचा मुलगा आर्यन खान यांचे छायाचित्र ठेवण्यात आले होते.