हेरगिरी करणारी चीनची नौका श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात पोचली !

भारताची सैनिकी आणि आण्विक केंद्रे रडारवर !

कोलंबो (श्रीलंका) – भारताच्या विरोधानंतरही श्रीलंकेने अनुमती दिल्यानंतर चीनची ‘युआन वांग-५’ ही हेरगिरी करणारी नौका १६ ऑगस्टला सकाळी श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरावर पोचली. ही नौका २२ ऑगस्टपर्यंत तेथे असेल. ही हेरगिरी नौका जवळपास ७५० किलोमीटर अंतरावरील टेहळणी करू शकते. त्याच्यावर उपग्रह आणि आंतरखंडीय क्षेपणास्त्रे यांवर लक्ष ठेवण्याची विशेष यंत्रणा आहे. भारत या प्रकरणी सतर्क असून या नौकेवर लक्ष ठेवून आहे.

हंबनटोटा बंदरावर पोचल्यानंतर या नौकेवरील रडारच्या कक्षेत दक्षिण भारतातील कलपक्कम् आणि कुडानकुलाम् यांसारखे प्रमुख सैनिकी अन् आण्विक केंद्रे येतील. यासह आंध्रप्रदेश, केरळ आणि तमिळनाडू येथील बंदरेही तिच्या रडारवर येतील. काही तज्ञांच्या मते चीनने भारतीय नौदलांची ठिकाणे आणि आण्विक केंद्रे यांच्या हेरगिरीसाठी ही नौका श्रीलंकेला पाठवली आहे.