हलाल अर्थव्यवस्थेला संघटितपणे विरोध करा ! – दुर्गेश परुळकर, ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते

‘हलाल शो इंडिया’च्या विरोधात कल्याण येथे राष्ट्रप्रेमींचे आंदोलन

आंदोलनात सहभागी राष्ट्रप्रेमी

कल्याण – हलाल प्रमाणपत्र आणि हलाल उत्पादनांची विक्री यांतून आतंकवादी कारवायांसाठी अर्थपुरवठा होत असल्याचे पुरावे समोर येत आहेत. हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून समांतर अर्थव्यवस्था निर्माण केली जात आहे. १२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी मुंबई येथे होणार्‍या ‘हलाल शो इंडिया’च्या विरोधात राष्ट्रप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन याला विरोध करा, असे आवाहन ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते श्री. दुर्गेश परुळकर यांनी कल्याण पूर्व येथे झालेल्या आंदोलनात केले.

ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते श्री. दुर्गेश परुळकर यांनी केलेले आवाहन –

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केलेले आवाहन –

या आंदोलनात विश्व हिंदु परिषदेचे कल्याण (पूर्व) येथील धर्मप्रचारक अधिवक्ता शिवानंद पांडे, श्री रामप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. अनिल जयस्वाल, हिंदु भारत विकास परिषदेच्या श्रीमती नीरजा मिश्रा, कल्याण येथील भाजपचे माजी शहर उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र डहाके, अधिवक्ता सर्वेश यादव, अधिवक्ता प्रियेश सिंह, डॉ. किशोर जैन, तसेच बजरंग दलाचे कार्यकर्ते, कल्याण येथील सद्गुरु श्री स्वामी समर्थ मठ, श्री राम हिंदु सेना, हनुमान मित्र मंडळ आणि हिंदु जनजागृती समिती आदी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी हलालसक्ती विरोधी कृती समितीच्या माध्यमातून हे आंदोलन केले.