एन्.डी.टी.व्ही.चे पत्रकार नसीम अहमद मंदिरातील कार्यक्रमात सहभागी झाल्याने धर्मांधांचा विरोध

पोलिसांकडून १२ जणांविरुद्ध गुन्हा नोंद

आगरा (उत्तरप्रदेश) – एन्.डी.टी.व्ही. या वृत्तवाहिनीचे पत्रकार नसीम अहमद येथील मनकामेश्‍वर मंदिरात हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले आणि त्यांनी कपाळावर टिळा लावला, तसेच गळ्यात भगवे उपरणे घातले. त्यांनी या स्थितीतील छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित केली. त्यानंतर धर्मांध मुसलमानांकडून नसीम यांना विरोध होऊ लागला आहे. व्हॉट्स अ‍ॅप गटावर त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण करण्यात आले. या प्रकरणी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी १२ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. इम्रान, अर्शद, हाजी कुरैशी आणि लाला कुरैशी अशी त्यांची नावे आहेत.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या मंदिरात इफ्तार पार्टीचे आयोजन केलेले धर्मांध मुसलमानांना चालते; मात्र एखाद्या मुसलमानाने हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला, तर त्यांना चालत नाही ! या दुटप्पीपणाविषयी निधर्मीवादी राजकीय पक्ष आणि नेते तोंड उघडतील का ?
  • सर्वधर्मसमभाव केवळ हिंदूंनी पाळायचा आणि अन्य धर्मियांनी त्यांची धर्मांधता जोपासत रहायची, अशी आज देशातील स्थिती झाली आहे !