(म्हणे) ‘भारतात सर्व जण उपाशी मरत आहेत, तू तेथे परत का जात नाहीस ?’- अमेरिकी लेखिका एन्. कोल्टर

अमेरिकी लेखिका एन्. कोल्टर यांच्याकडून अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नेत्या निक्की हेली यांच्यावर वर्णद्वेषी टीका

अमेरिकी एन्. कोल्टर व निक्की हेली

वॉशिंग्टन (अमेरिका) – गायींची कोण पूजा करतो ? भारतात सर्व जण उपाशी मरत आहेत. तेथील मंदिरांमध्ये उंदरांचे साम्राज्य आहे. तू तुझ्या भारतात परत का जात नाहीस ?’ अशी वर्णद्वेषी टीका अमेरिकेतील प्रसिद्ध लेखिका आणि अधिवक्त्या एन्. कोल्टर यांनी रिपब्लिकन पक्षाच्या भारतीय वंशाच्या नेत्या निक्की हेली यांच्यावर केली. एका ‘पॉडकास्ट’मध्ये (संभाषण ध्वनीमुद्रित करून प्रसारित करणे) कोल्टर यांनी ही टीका केली.

एन्. कोल्टर यांनी हेली यांचा ‘चारित्र्यहीन’ असाही उल्लेख केला आहे. निक्की हेली यांनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी दावा केला आहे. त्यावरून एन्. कोल्टर यांनी ही टीका केली आहे. कोल्टर म्हणाल्या की, निक्की हेली यांना २ टक्क्यांहूनही अधिक मते मिळणार नाहीत. कोल्टर यांनी यापूर्वीही हेली यांच्यावर वर्णद्वेषी टीका केली आहे.

संपादकीय भूमिका

ही आहे अमेरिकी लोकांची मानसिकता ! असे अमेरिकी भारतात अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत असल्याचा कांगावा करत असतात !